
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९०३ वा दिवस *सेषा प्रसन्न वरदा नृणां भवति मुक्तये* ती जगन्माता प्रसन्न झाल्यास माणसाला वर (आशिर्वाद) देऊन मुक्त करते. या महामायेला पूजावंदनादीद्वारा जोवर प्रसन्न करून घेत नाहीत, तोवर काय मजाल आहे ब्रम्हा-विष्णू-महेशादिकांची देखील की, ते तिच्या हातून सुटून मुक्त होऊ शकतील? भारतात आदर्श स्त्रिजीवन म्हणताच एकमात्र मातृभावाचीच कल्पना आम्हा भारतीयांच्या मनात येते. भूतलावरील परमेश्वराचे साक्षात स्फुर्लिंग म्हणून आपण मातेची आळवणी करतो. बालपणी मुलामुलींनी नित्यनेमाने आपल्या मातेच्या चरणी मस्तक ठेवून, त्या चरणांचे तीर्थ घ्यावे, अशी आमची संस्कृती आहे.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २१ वैशाख शके १९४७*
★ वैशाख शुध्द /शुक्ल १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. ११ मे २०२५
★ श्री नृसिंह जयंती
★ १८९५ भारतीय तत्वज्ञानी जे कृष्णमूर्ती यांचा जन्मदिन
★ १९५१ गझनीच्या महंमदने उध्वस्त केलेल्या बारा जोतिर्लिंगापैकी एक सोमनाथ मंदिरात राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
★ राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान दिन
★ जागतिक मातृत्व दिन
★ मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृत्व दिन असतो
★ मातृत्व दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
