
सिन्नर ( प्रतिनिधी ) ११ मे २०२५ महात्मा पदवी दान दिन महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा फुले यांचा पुतळ्यास जिल्हा आधिकारी अक्षय पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा आधिकारी अक्षय पवार यावेळी म्हणाले की.११ मे १८८८ रोजी मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथे असलेल्या वडगांव गादी रघुनाथ अर्थात रघुनाथ महाराज सभागृह मध्ये झालेल्या कार्यक्रमात मुंबईतील कष्टकरी जनतेच्यावतीने जोतीराव फुलेंना ” महात्मा” पदवी प्रदान केली होती. त्याचे हे स्मरण…११ मे १८८८ रोजी जोतीराव फुलेंच्या वयास साठ वर्ष पुर्ण झाली होती.त्यांनी निवडलेला जीवनमार्ग कडकडीत व खडतर होता. या मार्गावर ते सतत चाळीस वर्ष चालत होते.ती एक सामाजिक तपश्चर्या होती. या काळात त्यांना पुरेशा सोयी-सुविधा नसतांनाही महाराष्ट्राचा कानाकोपरा धुंडाळून काढला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की ब्राह्मण स्त्रियांचे जे उग्र प्रश्न ब्राह्मणांनी सोडवायचे होते, ते या माळ्याच्या पोराने सोडवले होते. समस्त ब्राह्मण समाजावर माळी समाजाचा व जोतीराव फुलेंचा हा हिमालयाऐवढा उपकार आहे, जो ब्राह्मणांनी अजूनही फेडलेला नाही!असे म्हणाले विजय मुठे म्हणाले की.छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या शोधा बरोबरच पहिली शिवजयंती साजरी करून महाराजांवरती पहिला पोवाडा लिहिला.शेतकऱ्यांची दयनीय अवस्था का झाली हे शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकातुन दाखवून दिले. सागर भालेराव म्हणाले की जोतिराव फुले हे पहिले समाजसुधारक ठरतात.अज्ञानाच्या अंधकारत अडकलेल्या बहुजन समाजाला. ज्ञानाच्या प्रकाशात आणण्यासाठी जीवनभर ज्यांनी कार्य केले अस्पृश्यतेच्या विरोधात कृतिशील आंदोलन केले.स्वत:च्या घरातील पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली सुनिल कृ-हे म्हणाले की चळवळी, अनेक विचारवंत व समाजसुधारक उदयास आले. जोतिरावांच्या नेतृत्वात भारतातली पहिली कामगार संघटना उभी राहिली. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे दिन बंधू वृत्तपत्र उभे राहिले. सत्यशोधक समाज स्थापन करून सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या मध्ये समाविष्ट करून घेतले. कांताराम माळी म्हणाले की समाजसुधारकाच्या प्रति आदर म्हणून मुंबई मधील भायखळा येथे असलेल्या रघुनाथ महाराज सभागृहामध्ये मुंबईयेथील जनतेने जोतिराव फुलेंना वयाच्या ६१ व्या वर्षी महात्मा ही पदवी बहाल केली. डाॅ जी.एल.पवार म्हणाले की.सदरील समारंभास रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे,रावबहादूर वंडेकर,स्वामी रामय्या अय्यावारू, मोरो विठ्ठल वाळवेकर इत्यादी मातब्बर मंडळी उपस्थित होती महात्मा फुले कि जय जय ज्योती जय क्रांती या जयघोषांनी कितीतरी वेळ देत राहिले या कार्यक्रमाचे सुञसंचलन सुनिल कुऱ्हे प्रास्ताविक विजय मुठे आभार सागर भालेराव यावेळी जिल्हा आधिकारी अक्षय नलिनी विलास पवार महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे मार्गदर्शक निवृत्ती भांगरे, सहसंस्थापक विजय मुठे,से.नि.मुख्याध्यापक निवृत्ती महात्मे, से.नि.मुख्याध्यापक गोविंद मोरे, आदर्श पो.पा.बाळकृष्ण पवार, डाॅ.जी एल पवार,सुनिल कुऱ्हे, सागर भालेराव, पत्रकार कांताराम माळी,डाॅ आनंद सानप, सौ.नलिनी पवार, विलास पवार राजेंद्र पवार, प्रकाश भाटजीरे, शिवा सातभाई, अजय लोंढे,भानुदास मुठे,किरण मुठे,
