
नांदगाव (प्रतिनिधी )भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप थोरात यांचा बँक ऑफ बडोदा शाखा नांदगाव यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा नांदगाव तालुक्यातील बँक ऑफ बडोदा येथील आपल्या कर्जदारांनी लोन निल करून पैसे भरून आपण आपल्या मार्फत बोजा कमी करून देखील आपण त्यांना लोक अदालतची नोटीस पाठवली. आमच्याकडे आपल्या बँक ऑफ बडोदा नांदगाव शाखेतील अनेक कर्जदारांनी तक्रार केली आहे कर्जदारांनी कर्ज पैसे भरून देखील आपणा कडून बोजा कमी करून देखील आपण त्यांना लोकअदालत ची नोटीस पाठवली आहे आपल्या बँक ऑफ बडोदा मध्ये लोन नील असतांना सिस्टीमला कर्ज तसेच दिसत आहे संबधित जो अधिकारी असेल त्यांच्या या अफरातफरीसाठी आम्ही जन आंदोलन छेडणार आहे यासाठी सर्वस्वी जबाबदारी आपली असेल व सदरील कर्जदारांना आपण न्याय द्यावा
