
कामठी( प्रतिनिधी )कामठी येथील पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपराअनेक वर्षांपासून सुरू आहे.मागील वर्षी प्रमाणे या वर्षी देखील विज्ञान शाखेचा निकाल ९९.४३ टक्के वाणिज्य शाखेचा निकाल ७५.६३तर कला शाखेचा निकाल ५६३.०३.टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून कुमारी जानवी अरुण उके या विद्यार्थिनीने प्राविण्यसूचित प्रथम स्थान पटकाविले असून तिला ९१.६७ टक्के गुण मिळाले. अमन सुनील पाचेला ८६.८३ आणि शेरीश अहमद वशिदऊद्दीन अहमदला ८५.६७ टक्के गुण मिळाले.वाणिज्य शाखेचा निकाल ७५.६३ टक्के लागला असून कुमारी खुशबू शेषराव फुकट या विद्यार्थिनीला ८८.५० टक्के, मुस्फेरा फझेलत मोहम्मद कलीम ८७ टक्के तर तू अमनदीप सिंग अर्पित सिंग या विद्यार्थ्याला ८४.३३ टक्के गुण मिळाले. कला शाखेचा निकाल ६३.०३% लागला असून अर्पित प्रदीप बोरकर या विद्यार्थ्याला ७८.५० टक्के,सोफिया फातमा अहमद या विद्यार्थिनीला ७१.८३ टक्के तर कुमारी तनुश्री जगदीश धूळस या विद्यार्थिनीला ६९.६७ टक्के गुण मिळाले.गुणवत्ता यादीत स्थान पटकाविलेल्या सर्व यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय चव्हाण,उपप्राचार्य डॉ सुधीर अग्रवाल पर्यवेक्षक प्रा.व्ही बी.वंजारी व सर्व शिक्षक वृद्धांनी अभिनंदन केले आहे.
