
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८९९ वा दिवस गाजावाजा न करता, शांतपणे व धीर धरुन एकसारखे कार्य करीत रहा. आपल्या कामात नियमीतपणा व सातत्य जर असेल तर निश्चितपणे आपले कार्य एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचते. यासाठी जाहीरातबाजीची आवश्यकता नसते. तुमच्या कामातून त्याची प्रसिद्धी होते. आपल्यासमोर जे कर्तव्य असेल, आपल्या हातात जे काम असेल ते निष्ठेने केल्यामुळे आपल्याला सामर्थ्य प्राप्त होते. अशा रीतीने आपली शक्ती वाढत गेली तर जीवनात आणि समाजात जे अत्यंत सन्माननीय समजले जाते, असे दायित्व आपल्यावर अत्यंत जबाबदारीने सोपवले जाते.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १७ वैशाख शके १९४७*
★ वैशाख शुध्द /शुक्ल १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ७ मे २०२५
★ १८६१ नोबेल पारितोषिक विजेते कविसम्राट, “गीतांजलीकार” गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची जयंती.
★ १८७८ पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे भरविण्यात आले. अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती रानडे होते.
★ १८८० विख्यात कायदेपंडित, महामहोपाध्याय भारतरत्न डॉ. पांडूरंग वामन काणे यांचा जन्मदिन.
★ २००२ जेष्ठ साहित्यिका दुर्गा भागवत यांचा स्मृतीदिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
