
कसबे सुकेणे (प्रतिनिधी) – मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक विद्यालयातील सन 2004/2005 च्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल वीस वर्षानंतर स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने अत्यंत भावनिक वातावरणात विद्यार्थी व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला राष्ट्रगीताने मेळाव्याला सुरुवात झाली अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक मधुकर काळे होते सुरुवातीला उपस्थित शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी आत्तापर्यंत दिवंगत झालेले माजी विद्यार्थी,शिक्षक व दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या देशवासीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी उपस्थित सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते भेटवस्तू, शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले माजी विद्यार्थी रागिनी खापरे, रुपाली जाधव,श्रीकांत कातकाडे,अभिजीत सोनवणी, अमोल भंडारे,गोकुळ भंडारे यांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मेळाव्याची कल्पना आखली त्यांना सहाय्यक व सहकार्य करण्याचे काम रजनी सोनवणे, कविता पगारे,स्नेहा औसरकर, पूजा गायकवाड,किशोर कातकाडे,तुषार जाधव, निलेश सोनवणे,इंद्रायणी मोगल, किरण शेवकर यांनी केले या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला उपस्थित शिक्षकांमधून मारुती खापरे, रामदास गाडे,श्री पल्हे,ज्ञानेश्वर भवर,श्रीम कल्पना दरेकर भारत मोगल,अरुण लहितकर, मधुकर काळे,दौलत शिंदे यांनी तर विद्यार्थी डॉ. प्रीतेश मोहन, रजनी सोनवणे, गौरी देशमुख,रुपाली जाधव यांनी मनोगत व्यक्त केले मिळाव्याला मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन रायभान दवंगे व भारत मोगल यांचे लाभले सूत्रसंचालन रागिनी खापरे व रजनी सोनवणे यांनी तर आभार प्राचार्य रायभान दवंगे यांनी मानले मेळाव्याला शिवाजी रहाणे, मोहन आहेर, राजेंद्र काळे, संजय नवगिरे, भारत पगार, श्रीम सुनंदा पगार,श्रीम मथुरा बिडवे आदींसह 120 विद्यार्थी व 35 शिक्षक उपस्थित होते
