
“सिन्नर (प्रतिनिधी )चिरंजीव अक्षय नलिनी विलास पवार”याचा धोंडवीर नगरवासीयांकडून भव्य नागरी सत्कार सोहळा!..**चिरंजीव अक्षय यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश घेऊन उत्तीर्ण झाल्यापासून अनेक संस्था शाळा कॉलेजेस मधून त्याला बोलावले चालू होते परंतु लोकशाहीच्या संसद भवनात कार्यरत असलेला अक्षय वेळेअभावी लगेच सगळ्यांना वेळ देऊ शकला नाही परंतु काल ०३ तारखेला त्याची धोंडविरनगर गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येऊन ढोल ताशाच्या गजरात फुलांची उधळण करत त्याचे स्वागत करण्यात आले या सोहळ्याप्रसंगी धोंडविर नगरचे सरपंच विश्वास शिंदे अध्यक्षस्थानी होते. गावातील फुले स्मारकाला पुष्पहार अर्पण करत थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घेत अक्षय विचार मंचावर विराजमान झाला अतिशय आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता ,त्याचप्रमाणे आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंदालाही पारावर उरलेला नव्हता गावकरीही अतिशय उत्साहात अक्षयला आलिंगन देत होते यावेळी अक्षय च्या सर्व मित्र परिवार गावातील ग्रामस्थ नातेवाईक हजर होते विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षांसह ग्रामपंचायत पदाधिकारी, सनदी लेखापाल व श्रीनाम फाउंडेशन चे संस्थापक भारत सोनवणे , जी प शाळा धोंडविर नगर चे मुख्याध्यापक वाळूंज सर उपसरपंच रतन सोनवणे, सदस्य संजय पवार,शालिनी पवार, नितीन सोनवणे, शिवाजी सोनवणे, कविता पवार, व अक्षय चे वडील विलास पवार आई नलिनी पवार व इतर ज्येष्ठ नागरिक विराजमान होते.

सदर कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच भाऊसाहेब पवार यांनी केले… यावेळी त्यांनी आपल्या सभोवतालचा परिस्थितीतील केवळ भौतिक विकासाच महत्त्वाचा नसून आपले पाल्य व पुढील पिढी अतिशय संस्कृत व शैक्षणिक दृष्ट्या विकसित निर्माण व्हावी यासाठी पालकांनी जागरूक होऊन मुलांना योग्य मार्गदर्शन व शैक्षणिक प्रगतीसाठी खुला मार्ग पत्करावा त्यासाठी थोर महापुरुषांची विचारसरणी व अक्षय सारखे आदर्श युवकांनी समोर ठेवावे मुलांच्या यशस्वीतेसाठी आम्ही ग्रामस्थ सदैव तुमच्या चांगल्या कार्याचा गौरव करण्यासाठी नेहमी पुढे असो अशी ग्वाही दिली व पालकांनीही आपल्या खऱ्या प्रॉपर्टी या आपल्या सुसंस्कृत व संस्कारीत मुलांमध्येच आहे हे जाणून कर्तव्यदक्ष रहावे अशी सूचना केली… ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने अक्षयचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी अक्षय चे वडील व आई यांनी आपले मनोगत व्यक्त केले व अक्षयच्या अथक प्रयत्नांना यश आले अशा भावना व्यक्त केल्या तर नंतर अक्षय चे शिक्षक प्राध्यापक के डब्ल्यू सोनवणे सर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक वाळूंज सर ,प्रा.नारायण पवार ,ह भ प भीमराज पवार, अक्षय चे मामा कांताराम ची माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले…*याप्रसंगी अक्षयने मी जरी यूपीएससी उत्तीर्ण होऊन सनदी अधिकारी झालो असलो तरी तमाम धोंडविरनगरकरांच्या सेवेसाठी तत्पर राहील यानंतर धोंडवीर नगर मधील प्रत्येक विद्यार्थ्याला मला जितके शक्य असेल तितके मार्गदर्शन व मदत करण्यासाठी मी कटिबद्ध राहील माझ्याकडून हीच माफक अपेक्षा असेल की प्रत्येक विद्यार्थी तरुण यांनी आपले गोल ठरवून त्या पद्धतीने अभ्यासाची तयारी करावी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात आपण एक- एक पाऊल पुढे टाकत घवघवीत यश संपादन करावे आणि धोंडवीर नगरच्या यशात भरभक्कम भर घालावी अडचणी येत असतात अडचणींवर मात करून आपल्याला शिक्षण पूर्ण करायचे असते पालक आपल्याला साथ देत असतात आपण त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी व आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्यपूर्ण अथक परिश्रम करावे कुठे अडचण आल्यास आमच्यासारख्या मित्रांशी सल्ला मसलत करून योग्य निर्णय घ्यावा… त्याचप्रमाणे पालकांनीही आपल्या पाल्यासाठी अभ्यासासाठी योग्य तो वेळ द्यावा अशा सूचना केल्या त्याचप्रमाणे यूपीएससी एमपीएससी व त्याव्यतिरिक्तही जीवन जगण्यासाठी व उत्कृष्ट ध्येय गाठण्यासाठी खूप काही आहे त्या दिशा आपण शोधाव्या आणि त्याला गवसनि घाल्यासाठी प्रयत्न करावा मी शोधलेला व निवडलेला मार्ग आणि त्यात आलेल्या अडचणी अतिशय सु- संवादितपणे अक्षयने व्यक्त केल्या..*यावेळी धोंडवीर नगरचे माजी सरपंच भाऊसाहेब पवार यांनी अक्षयला संविधानाची प्रत देऊन सन्मान करत यापुढे लोकसेवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची सतत आठवण ठेवून उल्लेखनीय कामगिरी करावीस अशी अपेक्षा व्यक्त केली*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कृष्णा सोनवणे यांनी केले. धोंडविरनगरचे पोलीस पाटील माननीय बाळासाहेब पवार यांना नुकताच राज्यस्तरीय राज्यपाल आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांचाही यावेळी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.. आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस पाटील यांनी आमच्या या श्रेया मध्ये गावकऱ्यांचा खूप मोठा मोलाचं वाटा आहे तर आजच्या तरुण पिढी व विद्यार्थी यांनी प्रचंड मेहनत घेऊन आपल्या उज्वल भवितव्यासाठी पाऊल टाकावीत आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी असो अशी ग्वाही दिली. *चिरंजीव अक्षयचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा धोंडविरनगर व पुढील पाचवी ते दहावी शिक्षण वाजे विद्यालय व त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण केटीएम कॉलेज नासिक येथे पूर्ण झाले.शिक्षण पूर्ण करत असताना पाचवीपासून तो आपल्या आत्या व मामा म्हणजेच कांताराम माळी यांच्याकडे असे श्रीयुक्त कांताराम माळी आपले मनोगत व्यक्त करताना अक्षय घेतलेल्या परिश्रमाची गाथा सांगत होते त्यावेळी त्याच्या अनेक कठीण प्रसंगांचे ते साक्षीदार असल्याचे व तशा भावना व्यक्त करताना ते आपले आनंदाश्रू व भावना रोखु शकले नाहीत…*सर्वच गावकऱ्यांनी अक्षय ने मिळवलेल्या यशाचे कौतुक केले. *अध्यक्ष भाषणामध्ये सरपंच विश्वास सोनवणे यांनी अक्षयला आई-वडील ग्रामस्थ यांना कधी विसरू नको व तुझ्या हातून देशाची व गावाची सेवा घडो असा सल्ला दिला.*आभार प्रदर्शन बाळासाहेब पवार यांनी केले यावेळी धोंडविरनगरचे बहुसंख्य महिलांनी अक्षयचे औक्षण करत आशीर्वाद दिला, यावेळी ग्रामस्थ तरुण युवक व युवती हजर होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वच तरुणांचा मोठा सहभाग होता.*कार्यक्रम प्रसंगी… सोपान पडवळ, माजी सैनिक घोटेकर, सुभाष पवार, सचिन पवार, नितीन पवार, दशरथ पवार, तानाजी शिंदे, शशिकांत सोनवणे, योगेश पवार, ह भ प बाळकृष्ण पवार त्याचप्रमाणे महिला बचत गटांच्या कार्यकर्त्या अशा कार्यकर्त्या व इतरही बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते
