
इंदूरमधील तीन वर्षांच्या मुलीला असाध्य आजार जडला, मात्र ती बचावण्याची शक्यता अत्यल्प उरल्याने माता-पित्यानेच तिला ‘संथारा’ देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. डॉक्टरांनी वियाना जैन या तीन वर्षांच्या चिमुरडीला ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान केले होते. ‘संथारा’ म्हणजे जैन धर्मानुसार उपवास करुन मृत्यू स्वीकारण्याची प्रथा. वियानाचे वडील पियुष जैन उच्चशिक्षित असून आयटी क्षेत्रात काम करतात. वियानावर मुंबईत उपचार सुरु असताना तिची तब्येत खालावली. यावेळी धार्मिक गुरु राजेश मुनी महाराज यांच्या भेटीत वियानाला ‘संथारा’ देण्याचा पर्याय सुचवण्यात आला. त्यानंतर कुटुंबाने ‘संथारा’ देण्याचा पर्याय सुचवण्यात आला. त्यानंतर कुटुंबाने संथारा देण्याचा ‘धार्मिक मार्ग’ निवडला. परंतु या घटनेमुळे अनेक कायदेशीर आणि नैतिक प्रश्न निर्माण झाले आहे.संथारा, जैन धर्मातील स्वेच्छेने मृत्युसाठी उपवास करण्याची प्रथा, बेकायदेशीर नाही. २०१५ मध्ये, राजस्थान उच्च न्यायालयाने ही प्रथा आत्महत्येचा एक प्रकार मानली आणि ती बेकायदेशीर घोषित केली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली, त्यानंतर ही प्रथा सुरूच राहिली. संथारा, ज्याला सल्लेखाना म्हणूनही ओळखले जाते, ही जैन धर्माची एक महत्त्वाची धार्मिक प्रथा आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वेच्छेने उपवास करून आपल्या मृत्यूची तयारी करते. जैन धर्मात हे एक पवित्र आणि सन्माननीय कृत्य मानले जाते. संथारा आणि कायदेशीर पैलूबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे येथे आहेत:कायदेशीर मान्यता:सर्वोच्च न्यायालयाने संथाराला वैध ठरवले आहे आणि ते धार्मिक स्वातंत्र्याचे एक रूप मानले आहे. संथारा ही आत्महत्येपेक्षा वेगळी मानली जाते कारण ती एक धार्मिक निर्णय आहे, तर आत्महत्या ही निराशा किंवा तणावातून केलेली कृती आहे. संथारा घेणाऱ्या व्यक्तीला हा निर्णय पूर्णपणे स्वतःच्या इच्छेने घ्यावा लागतो आणि ही एक लांब आणि संथ प्रक्रिया आहे ज्यामध्ये त्या व्यक्तीला मागे हटण्याची संधी असते. सल्लेखाना आणि संथारा ही एकाच प्रथेची वेगवेगळी नावे आहेत. संथारा ही जैन धर्मातील एक महत्त्वाची धार्मिक प्रथा आहे आणि जैन लोक तिचा खूप आदर करतात. संथारा घेणाऱ्या व्यक्तीला त्याच्या आरोग्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेण्याची परवानगी आहे.मुले आणि किशोरांना परवानगी नाही:मुलांना आणि तरुणांना संथारा घेण्यास मनाई आहे. मात्र या निर्णयाच्या विरोधात जाऊन इंदोर येथील तीन वर्षीय मुलीला तिच्या पालकांनी एका आध्यात्मिक गुरूच्या सल्ल्यानुसार जैन धर्मात दीक्षा दिली आणि मृत्यू पर्यंत उपवास केला आणि यातच तिचा मृत्यू झाला.एका अल्पवयीन मुलीच्या संथारावर कायदेतज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या अल्पवयीन मुलाच्या जीवनाचा आणि मृत्यूचा निर्णय घेण्याचा अधिकार पालकांनाही नाही. संथारा अशा अल्पवयीन मुलाला देता येतो का जो कायद्याने किंवा भावनिक दृष्ट्या मृत्यू समजू शकत नाही हा एक गंभीर कायदेशीर आणि घटनात्मक प्रश्न आहे. इकडे कलम २५ धार्मिक स्वातंत्र्य देते पण ते कायद्यापेक्षा मोठे नाही धार्मिक प्रथा देखील अल्पवयीन मुलाच्या जगण्याच्या अधिकारावर उल्लंघन करू शकत नाही याचाच अर्थ धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघनकरता येत नाही. ‘संथारा’ योग्य आहे की नाही? अल्पवयीन मुलांसाठी हा निर्णय कोण घेऊ शकतो? कायद्याने याबद्दल काय तरतूद आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे.२०१५ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने संथारा बेकायदेशीर ठरवला होता.३०६ अंतर्गत आत्महत्या मानले.मात्र जैन समुदायाच्या लोकांनी या निर्णयाविरुद्ध देशव्यापी आंदोलन केले होते.परिणामतः सर्वोच्य न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलानी संथारा घेतल्यास काय कराचे,याबद्दल कोणताही नियम नाही.यावर कायदेशीर दृष्टिकोनातून विचारमंथन होणे आवश्यक आहे.९५६१५९४३०६
