
इगतपुरी (प्रतिनिधी ) इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचा एच.एस.सी.बोर्डाच्या परीक्षेत कला शाखेचा निकाल ९४.१६ % , वाणिज्य शाखेचा ९६.४२% तर विज्ञान शाखेचा ९८.३०% तर एकूण महाविद्यालयाचा निकाल ९६.२८% निकाल लागला असून कला शाखेत प्रथम क्रमांक कु.मुनीरा अत्ताउलाह बहलिम ९३.३३% ,तर द्वितीय क्रमांक कु.देवीका विलास सुरूडे ९१.००% , वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक कु.दिपाली सोपान आडोळे ७८.००% , द्वितीय क्रमांक कु.सायली काळू तोकडे ७६.५०% तर विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक कु.पूर्वा रोहीदास रूपवते ६८.००%, द्वितीय क्रमांक कु.सानिका विलास भागवत ६६.८३% गुण मिळवून महाविद्यालयात उज्वल यश प्राप्त केले.या यशस्वी उज्ज्वल यश प्राप्त करणाऱ्या विदयार्थांचे मविप्र’ अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे, इगतपुरी तालूका संचालक अॅड.संदिपभाऊ गुळवे, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपतराव मुसळे, प्राचार्य डाॅ.किरण रकिबे , प्रा.राकेश गायकवाड, प्रा.संजय फाकटकर, प्रा.राजेंद्र दिवटे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले आहे.
