
रचना माध्यमिक विद्यालय, नाशिकच्या 2005 सालच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रचना विद्यालयाच्या (एस. एम. जोशी सभागृहात) संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुधाकर साळी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच मोठया उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी संस्था सचिव श्री. शांताराम आहिरे ,मुख्याध्यापक श्री. किशोर पालखेडकर, शिक्षक वृंद आणि सहभागी विद्यार्थी -विद्यार्थिनी दिसत आहे.
नाशिक ( प्रतिनिधी) तब्बल वीस वर्षांनी गजबजला रचना शाळेचा वर्ग 04 मे 2025 , सकाळी 9.00 वाजता रचना विद्यालयाचं प्रवेशद्वार उघडलं. प्रथमत: सहभागी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करून,लागलीच शाळा भरण्याची घंटा झाली.रचनाचे हे माजी विद्यार्थी, संस्थेचे पदाधिकारी,मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे देखील विद्यार्थ्यांबरोबरच उत्साहाने वर्गात बसले. वर्गात सदर माजी विद्यार्थ्यांची उपस्थितीबद्दल हजेरी घेण्यात आली. नंतर ओळीने मैदानात जाऊन तेथे विद्यार्थ्यांसाठी सावधान-विश्रामच्या सूचना झाल्या. लगेचच शाळेची सामुदायिक प्रार्थना व राष्ट्रगीत गायन झालं. यानंतर रचना शिक्षण संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, शिक्षकवृंद व उपस्थित मान्यवरांना पुष्प वर्षावात एस.एम. जोशी सभागृहात सन्मानपूर्वक नेण्यात आलं.या सर्व आयोजनाचे सुंदर निमित्त होते, रचना विद्यालयाच्या 2005 सालच्या बॅचचे स्नेहसंमेलनाचे ! व्यासपीठावर रचना संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुधाकर साळी ,संस्थासचिव श्री. शांताराम अहिरे, रचना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. किशोर पालखेडकर,तसेच शिक्षकवृंद श्री.पुरुषोत्तम ठोके, विजय जाधव, सायली महाजन, कल्पना आटवणे, श्री. यशवंतराव ठोके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.स्नेहसंमेलन कार्यक्रमास या मान्यवरांबरोबरच रचनाचे लोकप्रिय शिक्षक श्री .निलेश ठाकूर ,नितीन सपकाळे, मनीराम चव्हाण , ज्योती कुलकर्णी ,शेलार मॅडम ,शिंदेसर, गायकवाड सर कतवारेसर, श्री.वैष्णव,श्री. कौस्तुभदादा आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभली.प्रथमतः रचना शाळेशी संबंधित माजी पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व अन्य मान्यवरांचे नजीकच्या काळात दुःखद निधन झाले, अशा मान्यवरांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांना संयोजक विद्यार्थ्यांच्या वतीने शाल,आकर्षक स्मृतिचिन्ह, गुलाबपुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले. सदर स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन प्रसन्न उगलमुगले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तेजस्वी पांढारकर यांनी तर आभार प्रदर्शन दीपक रेवगडे यांनी केले .तसेच प्रशांत ढगे, निरंजन सोनवणे ,संदीप सोनवणे यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केलं. याप्रसंगी शिक्षकवृंदापैकी श्री. पुरुषोत्तम ठोके,सौ. कल्पना आटवणे,सौ. विद्याताई मोहाडकर आणि मुख्याध्यापक श्री. किशोर पालखेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.उपस्थित विद्यार्थ्यांपैकी तेजस महाजन, संदीप सोनवणे, प्रसन्न उगलमुगले,शलाका अमृतकर यांनी मनोगते व्यक्त केलीत.स्नेहसंमेलन कार्यक्रमास बंगळुरू, मुंबई, पुणे, नाशिक येथून सुमारे 70-80 विद्यार्थी प्रत्यक्षपणे सहभागी झालेले होते. तसेच काही विद्यार्थी हे देश-परदेशातून ऑनलाईन पद्धतीने स्नेहसंमेलनास उपस्थित होते.संगीत शिक्षिका सौ. ज्योती कुलकर्णी आणि विद्यार्थिनी रागिणी पारख यांच्या सुमधुर गायनामुळे कार्यक्रम एका सुंदर उंचीवर पोहचला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सुधाकर साळी सर यांच्या अध्यक्षीय मनोगतातुन गुणी विद्यार्थ्यांच्या कौतुकाबरोबरच शाळेविषयी विद्यार्थ्यांना वाटणारी आपुलकी, कृतज्ञता आणि त्यातून उतराई होण्यासाठी करावयाची इतिकर्तव्यता या महत्वाच्या बाबी अधोरेखित करण्यात आल्या. तब्बल वीस वर्षांनी पुन्हा आपल्या प्रिय शाळेत येण्याचा, त्याच वर्गात बसण्याचा, आपल्या शिक्षकांसोबत व मित्र मंडळींसोबत ते जुने दिवस प्रसन्नपणे अनुभवयास मिळाल्यामुळे, भरपूर समाधान व ऊर्जा मिळाल्याने विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले होते.या सर्व भावविभोर आठवणी, शाळेची ती पवित्र वास्तू,जिवलग मित्रांशी संवाद, गप्पा, फोटोसेशन आणि आपल्या आदरणीय गुरुवर्यांना कृतज्ञ नमस्कार करत या स्नेहसंमेलन कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
*वृत्तसंकलन* : प्रसन्न उगलमुगले मो.9422772645
