
गोडसे नम्रता रमेश विज्ञान शाखेत प्रथम

उपाध्ये नेतल निलेश, वाणिज्य शाखेत प्रथम

कला शाखेत -प्रथम क्रमांक सोनवणे सलोनी ठकाजी
लासलगाव ( प्रतिनिधी): फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या एच.एस.सी. बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा निकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही शंभर टक्के लागला. लासलगाव महाविद्यालयातून १२वी (HSC) कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून एकूण ५०८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ५०५ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. महाविद्यालयाच्या निकालाची टक्केवारी ९९.४० टक्के इतकी आहे. विज्ञान शाखेच्या निकालाची टक्केवारी १०० टक्के आहे. प्रथम क्रमांक गोडसे नम्रता रमेश (८९.०० टक्के), द्वितीय क्रमांक मोरे गायत्री पोपट (८८.८३ टक्के), तृतीय क्रमांक श्रीवास्तव तेजस चंद्रशेखर (८८.६७ टक्के), चतुर्थ क्रमांक कोल्हे तुषार साहेबराव (८८.५० टक्के), पाचवा क्रमांक कुशवाह सिद्धार्थ ओमहरी (८७.८३ टक्के) वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी १०० टक्के आहे. प्रथम क्रमांक उपाध्ये नेतल निलेश (९०.५० टक्के), द्वितीय क्रमांक जैन यश गौरव (८८.६७ टक्के), तृतीय क्रमांक दरेकर वैष्णवी नंदू (८७.१७ टक्के), चतुर्थ क्रमांक शेख रमशा रफिक (८६.८३ टक्के), पाचवा क्रमांक मोकळ प्रणाली पोपट (८६.५० टक्के) कला शाखेच्या निकालाची टक्केवारी ९८.१९ टक्के आहे. प्रथम क्रमांक सोनवणे सलोनी ठकाजी (८५.०० टक्के), द्वितीय क्रमांक सोनवणे हर्षदा चंद्रकांत (८३.६७ टक्के), तृतीय क्रमांक गांगुर्डे प्रतीक्षा बाळकृष्ण (८१.८३ टक्के), चतुर्थ क्रमांक जगताप श्रद्धा संतोष (७८.१७ टक्के), पाचवा क्रमांक वडनेरे शंभो राजेंद्र (७७.३३ टक्के) विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल नू.वि.प्र.संस्थेचे चेअरमन मा.श्री.प्रकाश पाटील, संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा.श्री.गोविंदराव होळकर, खजिनदार मा.श्री.अनिल डागा, नू.वि.प्र. मंडळाच्या मॅनेजिंग बोर्डाचे सर्व सन्माननीय सदस्य व इतर पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, डॉ.सोमनाथ आरोटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, परीक्षा विभाग, चेअरमन श्री.किशोर गोसावी कार्यालय अधिक्षक श्री.रविंद्र होळकर तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
