
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८९७ वा दिवस* वसुंधरेचा उपभोग केवळ वीरच घेऊ शकतात. हे अगदी अटळ सत्य आहे. जे निर्भय आहेत त्यांच्या हातूनच अपूर्व कार्य होऊ शकते. भिऊ नका. भय म्हणजे मृत्यू, भय हेच पाप, भय म्हणजेच नरक, भय म्हणजेच अधर्म, भय म्हणजेच व्यभिचार. जगात जे जे म्हणून अकारणात्मक विचार आहेत ते सारे या भयरुपी सैतानापासूनच निर्माण झाले आहेत. भय हीच सर्वात जास्त खुळचट अशी समजूत आहे. हे भयच आपल्या दुर्गतीचे कारण असून निर्भय झाल्याने एका क्षणात स्वर्गप्राप्ती देखील होऊ शकेल. त्यासाठी निर्भय व्हा! व कार्यास सिद्ध व्हा. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १५ वैशाख शके १९४७*
★ वैशाख शुध्द /शुक्ल ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. ५ मे २०२५
★ १८१८ साम्यवादाचे प्रणेते, जर्मन तत्वज्ञ कार्ल मार्क्स यांचा जन्मदिन.
★ १८२१ असामान्य सेनापती, कर्तबगार प्रशासक, जगज्जेता, फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट याचा स्मृतीदिन.
★ १९१६ भारताचे ७ वे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचा जन्मदिन.
★ १९१८ बालकवी तथा निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा स्मृतीदिन
★ जागतिक व्यंगचित्रकार दिन.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
