
नाशिकरोड:-(प्रतिनिधी ) जुना सायखेडा रोडवरील विमल नगरमधील नारायण विष्णू टिल्लू (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर दसक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दीपक टिल्लू आणि नासाका माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी अभय टिल्लू यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
