
मुंबई ( प्रतिनिधी)बारावीच्या विद्यार्थ्यांचे आज भविष्य ठरणार आहे. राज्य शिक्षण मंडळाचा बारावी परीक्षेचा (एचएससी) निकाल उद्या सोमवारी जाहीर केला जाणार आहे. दुपारी 1 वाजता मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 दिवस आधीच बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यंदा सीबीएसईचा निकाल जाहीर होण्याआधीच राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर होत आहे.कुठे पाहणार निकाल http://mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहता येईल.https://hscresult.mkcl.org mahahsWoard.in या संकेतस्थळांवरही निकाल पाहता येईल. महत्वाच्या तारखा गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येईल. 6 ते 20 मेदरम्यान अर्ज करता येतील. विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेत आपला निकाल सुधारता येईल. जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी, श्रेणी सुधार व खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्यांसाठी 7 मेपासून मंडळाच्या वेबसाईटवर अर्ज करता येतील.
