
येवला (प्रतिनिधी) येवला तालुक्यातील कोळम येथील आवारे वस्तीवर मध्यरात्रीला चार ते पाच अज्ञात दरोडेखोरानी घरात घुसून चाकूचा धाक दाखवून महिलांना बेदध मारहाण केली.त्यांनी चार वर्षांच्या लहान मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवत धमकी दिली. व घरातील सोन्याचे दागिने असा सुमारे ७१ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले आहे. याप्रकरणी येवला तालुका पोलिसात तीन अनोळखी दरोडेखोरांविरोधात भारतीय न्याय संहिता ३०५,३३१ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
