
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८९५ वा दिवस* ‘विनाश करू नका’ या तत्त्वावर पूर्णपणे निष्ठा ठेवा. कोणतीही वस्तू फोडू नका, तिचा नाश करु नका तर नवीन काहीतरी उभारा. तुम्हाला शक्य असेल ती मदत करा, नाहीतर किमान हात जोडून बाजूला तरी उभे रहा. जे जे काही चांगले घडत आहे ते घडू द्या. तुम्हाला दुसऱ्याला मदत करता येत नसली तरी निदान दुसऱ्यांचे अनिष्ट तरी करू नका. बिनकामाचे, कामचुकार लोक दुसर्यांच्या चुका, दोष शोधण्यातच आपले संपूर्ण जीवन व्यर्थ घालवतात. अशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या स्थानावर मनुष्य उभा आहे त्या स्थानावरून त्याला वर नेण्याचा प्रयत्न करा. विनाकारण त्यांचे पाय खाली खेचण्याचा प्रयत्न करु नका.
स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर १३ वैशाख शके १९४७*★ वैशाख शुध्द /शुक्ल ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ३ मे २०२५
★ गंगासप्तमी, गंगोत्पती, गंगापूजन★ १८९८ मराठी चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा जन्मदिन.
★ १९१३ चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके दिग्दर्शित “राजा हरिश्चंद्र” भारतातील पहिला मुक चित्रपट प्रदर्शित होऊन भारतीय चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
★ पत्रकारिता अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिन.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
