
नांदगाव (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभागामार्फत कालिदास कला मंदिर नाट्यगृहात स्पेलिंग बी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत नांदगाव तालुक्यातील *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरा येथील गायत्री अभिमन्यू पाटील इयत्ता दुसरीच्या गटात प्रथम क्रमांक मिळविला.* गायत्रीला तिच्या वर्गशिक्षिका कल्पना गीते मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तसेच *जिल्हा परिषद प्राथ. शाळा गंगाधरी लहान येथील प्रांजल जेजुरकर या विद्यार्थिनी इयत्ता तिसरीच्या गटात प्रथम क्रमांक मिळविला.* प्रांजल ला तिच्या वर्गशिक्षिका अंजना कोटमे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. लहान गटातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांनी घेतल्या. इतक्या लहान वयात विद्यार्थी इंग्रजी शब्दांच्या स्पेलिंग पटापटा सांगत असल्याचे पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी स्पेलिंग स्पर्धेचे आयोजन केलं याचे सार्थक झालं असे गौरवोद्गार काढले. तसेच *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी हेमंत अभिमन्यू पाटील याने वर्ड पॉवर चॅम्पियनशिप स्पर्धेत देशात सहावा क्रमांक मिळवला* त्यानिमित्ताने त्याचाही सत्कार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला त्याचे मार्गदर्शक श्री.गणेश साळी सर यांचेही मॅडमने कौतुक केले. या स्पेलिंग बी उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले साहेब शिक्षण विस्ताराधिकारी नंदा सोळुंके मॅडम , सर्व केंद्रप्रमुख आदींनी त्यांचे कौतुक केले.
