
मांडवड ( प्रतिनिधी)म.वि.प्र.संचलित स्व. शरद अण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवड येथे १ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिवस यांचे औचित्य साधून “विद्यार्थी गुणगौरव सोहळा” व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कवडे रमेश रामदास यांचा “सेवापूर्ती सोहळा” मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.**सर्वप्रथम १ मे महाराष्ट्रदिनानिमित्त राष्ट्रध्वजाचे “ध्वजारोहण” विद्यालयाचे मुख्याध्यापक कवडे आर. आर. यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील नवोदय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले इयत्ता ५ वी चे विद्यार्थी कुमार करण भास्कर आहेर व कुमार वरून भास्कर आहेर तसेच एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये व इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार इंजि.अमित भाऊ बोरसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त होणारे मुख्याध्यापक श्री.कवडे रमेश रामदास यांचा “सेवापूर्ती सोहळा “विद्यालया मार्फत संपन्न झाला.म.वि.प्र.संचालक इंजि.अमित भाऊ बोरसे-पाटील यांनी संस्था उभारणीसाठी कर्मवीरांनी केलेला त्याग, त्याच बरोबर संयुक्त महाराष्ट्र लढ्यात अनेक आंदोलनकर्ते शहीद झाल्याची आठवण उपस्थितांना करून दिली. व देशामध्ये महाराष्ट्राचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून उपस्थितांपुढे मांडले. सदर कार्यक्रमासाठी करूनेश्वर आश्रम, जोंधळवाडी येथील ज्योती गिरी महाराज उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून कामगार दिनाचे महत्त्व विशद केले. सदर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रशांत आहेर गावातील ज्येष्ठ नेते मविप्र जेष्ठ सभासद विठ्ठलआबा आहेर,दौलत हरी आहेर, वाल्मिक थेटे, प्रकाश आहेर, सर्जेराव थेटे, गंगाधर थेटे,अशोक निकम, डॉ. प्रवीण निकम, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक हेमंत परदेशी यांनी केले.मुख्याध्यापक सेवाकाळ परिचय कवडे एस. एस. यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन क्रीडाशिक्षक संदीप आहेर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.*
