
ओझर: (वार्ताहर )येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माधवराव बोरस्ते विद्यालयात राज्याचा ६६ वा स्थापनादिन व जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण शालेय समितीचे अध्यक्ष भास्करराव शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर ॲड धोंडीराम पगार वसंत गवळी लक्ष्मण चौधरी पुंडलिक गवळी सुभाष चौधरी रमेश पगार मनोज दहाडदे मनीषा बोडके मुख्याध्यापक सोपान वाटपाडे अभिनवच्या मुख्याध्यापिका वनिता शिरसाठ उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील पर्यवेक्षक दशरथ शिंदे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष भास्करराव शिंदे होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी केले. फलक लेखन कला शिक्षिका मोनाली निकम यांनी केले. यावेळी विद्यालयात प्रथम पाच विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुणपत्रक देण्यात आले. सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले.
