
कु. सोहम गाडेकर याचे पुणे येथे अभिनंदन करतांना प्रशिक्षक निनाद भडांगे
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथील विद्यार्थी कु.सोहम संतोष गाडेकर इ.१० वी ब याने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्केटींग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल व प्रमाणपत्र प्राप्त केले.कु.सोहम यास जेष्ठ क्रिडाशिक्षक अनिल पगार,शरद आहेर,सुनिता उशीर तसेच प्रशिक्षक निनाद भडांगे व पालक संतोष गाडेकर यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कु.सोहम गाडेकर याने मिळविलेल्या उज्वल यशाबद्दल मविप्र सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे,मविप्र अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,संचालक रमेश आबा पिंगळे,माजी सेवक संचालक डॉ.अशोकराव पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ.भास्करराव ढोके,अभिनव शालेय समिती अध्यक्ष निवृत्ती महाले,उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष पंडितराव पिंगळे,कला व वाणिज्य महाविद्यालय समिती अध्यक्ष सुरेश पिंगळे,होरायझन शालेय समिती अध्यक्ष शंकरराव पिंगळे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष वाळू काकड,शालेय समिती सदस्य, मविप्र सभासद,ग्रामस्थ,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्या विमल रायते,पर्यवेक्षक सुनील पाटील,सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले
