
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८९४ वा दिवस* धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती होय. मानवाने ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे म्हणजेच धर्म होय. ईश्वराशी एक होऊन गेले पाहिजे. मूर्ती म्हणा, मंदिर म्हणा, शास्त्रग्रंथ म्हणा; सर्वच धर्मजीवनाच्या बाल्यावस्थेतील केवळ साहाय्यक साधने आहेत. ती धर्म जीवनाचे अंतिम उद्देश वा लक्ष्य असू शकत नाही. धर्म ही केवळ ऐकण्याची किंवा बौद्धिक संमती देण्याची वस्तू नाही. ज्या सत्यावर आपला पूर्ण विश्वास आहे, त्याच्याशी आपल्या आत्म्याचे एकरूप होऊन जाणे म्हणजे धर्म होय.
स्वामी विवेकानंद… *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १२ वैशाख शके १९४७*
★ वैशाख शुध्द /शुक्ल ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. २ मे २०२५
★ १५१९ सुप्रसिद्ध इटालियन चित्रकार, संशोधक लिओनार्डो दा व्हिन्ची यांचा स्मृतीदिन.
★ १८४८ आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा स्मृतीदिन
★ १९२० हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रतिभावंत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्मदिन.
★ १९९८ गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, जेष्ठ काँग्रेस नेते पुरुषोत्तम काकोडकर यांचा स्मृतीदिन.
★ जागतिक हास्य दिन.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
