
निंबायती (वार्ताहर) – अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील विद्यालयात महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिन व जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तिपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे ध्वजारोहण प्राचार्य पी. एन. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे उपस्थित होते. समवेत सर्व संचालक, विश्वस्त पदाधिकारी, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांना निकालाचे वाटप करण्यात आले. वर्षभर प्रामाणिकपणे केलेल्या अभ्यासातून मिळालेले यश व उन्हाळी सुट्ट्यांमुळे विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अनेकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केलाा. यावेळी चावडी वाचन घेण्यात आले. सूत्रसंचलन प्रा. अमोल अहिरे यांनी केले. तर प्रास्तविक नरेंद्र अहिरे यांनी केले.
