
भोसरी ( प्रतिनिधी )काव्यातील नक्षत्र.. काव्यवाचन आविष्कार.. थिएटर मैफल रंगली-**२५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त….*नक्षत्राचं देणं काव्यमंच मुख्यालय ,भोसरी, पुणे वतीने आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन मे मध्ये संपन्न होणार आहे.त्या निमित्ताने लावणी थिएटरला आली आणि तीला प्रतिष्ठा मिळाली. तशीच कविता थिएटरला आणून तीला ही ,प्रतिष्ठा मिळवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पिंपरी चिंचवड रसिकांसाठी अनोखा कार्यक्रम आयोजित केला होता.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे . तिच्या संगोपनासाठी,वाढ होण्यासाठी सर्व रसिकांना विनामूल्य कार्यक्रम होता.यावेळी झाडाला पाणी घालून पर्यावरण संदेश देत उदघाटन संपन्न झाले.

यावेळी कार्य अध्यक्ष बोल्ड कवी म.भा चव्हाण म्हणाले,”या शहरात जेव्हा काहीच नव्हते. तेव्हा पासुन हि संस्था काव्य क्षेत्रात काम करत आहे.कवींना आदर व सन्मान मिळण्यासाठी अहोरात्र कार्यरत संस्था उपक्रमशील संस्था आहे.अनेक कवी कवयित्रींना घडविणारी एकमेव संस्था आहे. संस्था आज रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत आहे.हि अभिमानाची गोष्ट आहे.”यावेळी अनेक सुंदर रचना सादर झाल्या..*ज्याला काही बघायचे**त्याने आकाश बघावे.**ज्याला काही करायचे**त्याने मातीशी बोलावे.*आधी पचविले विषमग लिहिली कविता स्वतःलाच गाडल्याने माझी वाढली कविता अशाच एका वेदनेची झळ जीवा लागतेआणि हळूच हृदयातून कविता मग फुलतेपाऊस सुध्दा रूसतोतुझ्या सारखाचपाऊस सुध्दा हसतोतुझ्या सारखाचंनिमंत्रित कवी -कवयित्रींचा सहभाग होता त्या बोल्ड कवी म.भा. चव्हाण, पुणे,कवी वादळकार, भोसरी, बालाजी थोरात,चिंचवड, प्रा. उन्मेश शेकडे ,लातूर, पिराजी पाटील, कर्नाटक, रामदास अवचर ,अहिल्यानगर, सौ. रुपाली भालेराव ,आकुर्डी, सौ .दिव्या भोसले, दिघी, भाऊसाहेब आढाव,चिंचवड,बबन चव्हाण, चरहोली, सुरेशचंद्र चन्नाल, निगडी,पियुष काळे,आळे,विनायक विधाटे,पाबळ इ.नीप्रेम आणि पाऊस या विषयावरील विशेष काव्य मैफल गाजवली.अक्षय्य तृतीया निमित्त सांयकाळी प्रा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड पुणे ३३ येथे हा सोहळा रंगला.या कार्यक्रमाचे आयोजक व संयोजन तसेच सूत्रसंचालन नक्षत्राचं देणं काव्यमंच संस्थापक अध्यक्ष प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणेअतिशय देखणे नियोजन केले होते.अडीच तासात रसिक कवितेच्या पाऊसात ओलेचिंब झाले
