
मनमाड (प्रतिनिधी ) मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 111 व्या वर्धापन (स्थापना) दिना निमित्ताने सर्वांना मनःपुर्वक अगणिक हार्दिक शुभेच्छा मनमाड शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व साहित्य परंपरेमध्ये मानाचे,गौरवाचे स्थान असणार्या आणि मनमाड शहराचे सांस्कृतिक वैभव म्हणून ओळख असणार्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन जागरूक वाचक आणि दानशूर देणगीदार यांचे अखंड सहकार्याने मनमाड शहर व ग्रामीण परिसरात सातत्याने वाचक व साहित्य चळवळ सुरु ठेवणाऱ्या मनमाड़ सार्वजनिक वाचनालयाची स्थापना ०१ मे १९१५ रोजी झाली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून 111 वर्ष इतक्या मोठ्या कालावधीसाठी मनमाड शहरातील वाचकांची भुक अखंडपणे भागविणारे हे ऐतिहासिक मनमाड सार्वजनिक वाचनालय नासिक जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील शंभरी पार करणार्या मोजक्या वाचनालयांच्या यादीत गणले जाते. सन १९८० साला पर्यत ह्या वाचनालयाचे नाव मनमाड़ रिडिंग क्लब असे होते १९८० साली मनमाड़ सार्वजनिक वाचनालय हे नाव करण्यात आले मनमाड सार्वजनिक वाचनालयामध्ये ५० हजार पेक्षा जास्त ग्रंथसंपदा असून १२५० अधिकृत नोंदीत वर्गणीदार सभासद असून 475 सक्रिय आहेत .मनमाड सार्वजनिक वाचनालयामध्ये संदर्भ ग्रंथविभाग , बालसाहित्य विभाग, महिला साहित्यविभाग, स्पर्धापरिक्षा दालन, संगणक कक्ष विभाग, वृत्तपत्र विभाग, मासिक विभाग, चरित्र ग्रंथ विभाग, कादंबरी विभाग,ऐतिहासिक विभाग,कथा संग्रह विभाग, लेख संग्रह विभाग यांच्यासह 15 विभाग आहेत. मनमाड सार्वजनिक वाचनालयामध्ये ५० पेक्षा जास्त मासिक व साप्ताहिके वाचकांसाठी उपलब्ध केली जातात. तर मनमाड शहरामध्ये १९५५ पासून सलग ६६ वर्ष महात्मा गांधी मोफत वृत्तपत्र वाचनालय सार्वजनिक वाचनालयाच्या संचलनाद्वारे सुरु आहेत. या वृत्तपत्र विभागात ३५ पेक्षा जास्त मराठी , हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रे वाचकांसाठी दररोज मोफत उपलब्ध करुन दिली जातात. मनमाड शहराच्या इतिहासातील सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक घटनांचे गेल्या 111 वर्षापासून साक्षीदार असणारे हे मनमाड सार्वजनिक वाचनालय सोशल मीडिया च्या (व्हाट्सएप, फ़ेसबुक, इंटरनेट, टिविटर, इंस्टाग्राम, टेलीविजन संगणक) जगाशी स्पर्धा करीत मनमाड शहराला एक नवी सांस्कृतिक ओळख कायम देत आले आहे.ह्या सोशल मीडियाशी स्पर्धा करताना मनमाड सार्वजनिक वाचनालयाने या सोशल मीडियावर देखील आपली नवीओळख निर्माण केली असून फेसबुक वर मनमाड सार्वजनिक वाचनालय या नावाने पृष्ठ (पेज) उधडले असून सुमारे 1300 पेक्षा जास्त वाचक हे पृष्ठ (पेज) लाइक करीत फॉलोअर्स झाले आहेत मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथसंपदेच्या माध्यमातून गेल्या 110 वर्षात अनेक लेखक, कवी साहित्यिक,वक्ते,समाज सेवक,शिक्षक,राजकीय नेते,पत्रकार निर्माण झाले. तर अनेक विद्यार्थ्यांनी या वाचनालयाच्या ग्रंथसंपदेतून मोठी शैक्षणिक झेप घेतली. वाचनालयात उपलब्ध असलेल्या ५० हजार पेक्षा जास्त ग्रंथसंपदेमध्ये ऐतिहासिक , धार्मिक, कायदेविषयक,पौराणिक शैक्षणिक, बालसाहित्य, महिला साहित्य,युद्ध कथा,आध्यात्मिक विषयी, शेतीविषयक,व्यावसायिक, चित्रपट विषयक, गायन, कला, क्रीडासंबंधी, अनुवादित पुस्तके, राजकीय, सांस्कृतिक पुस्तके, संदर्भ ग्रंथ,चरित्रग्रंथ काव्यसंग्रह, कथा , कादंबर्या,संगीत विषयक जोतिष्य विषयक,पर्यावरण, जीवशास्र, गुंतवणूक विषयक,व्यक्तिमत्व विकास, उद्योग विषयक, वनस्पतिशास्त्र,योगशास्त्र, आरोग्यसंबंधी,लेखसंग्रह, प्रवास वर्णन,व्यवसाय मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन यूपीएससी ,एमपीएससी, स्पर्धा परीक्षा पुस्तकें,जनरल नॉलेज, पाककलासंबंधी,आत्मकथा पुस्तकांचा समावेश आहे दररोज १०० पेक्षा जास्त वर्गणीदार सभासद पुस्तकांची देवाणघेवाण करतात. मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे संपूर्ण वर्षभरात सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक स्वरुपाचे विविध कार्यक्रम साजरे करण्यात येतात ते खालीलप्रमाणे 1️⃣स्व.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गेल्या 58वर्षापासून मनमाड शहरात आंतरशालेय निबंध स्पर्धेचे आयोजन,
2️⃣ ०१ ऑगस्ट रोजी स्व.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनििमत्त गेल्या 58 वर्षापासून आंतरशालेय कथाकथन व वत्कृत्व स्पर्धा या दोन्ही स्पर्धांमध्ये मनमाड शहरातील 16 माध्यमिक विद्यालयातील सुमारे 800 पेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी सहभाग घेतात आणि वाचनालयातर्फे मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आकर्षक अशी रोख व पुस्तक स्वरुपाची पारितोषिके देण्यात येतात. याशिवाय मराठी दिन,जागतिक पुस्तक दिन, वाचक प्रेरणा दिन, थोर महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, उत्सव (महर्षी वाल्मिकी जयंती/राजमाता जिजाऊ जयंती/छत्रपती शिवराय जयंती/स्वामी विवेकानंद जयंती/भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती/स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती/महात्मा ज्योतीबा फुले जयंती/महात्मा गांधी जयंती/अहिल्याबाई होळकर जयंती/थोर स्वतंत्रता सेनानी मौलाना आझाद/पंडीत नेहरु जयंती/आदी मान्यवरांसह विविध महापुरुषांच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित केले जातात.
3️⃣ याशिवाय स्वतंत्रता दिन १५ ऑगस्ट व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देखील कार्यक्रमांचे आयोजन वाचनालयात केले जातात.१५ ऑक्टोबर ला वाचक प्रेरणा दिन,तसेच २७ फेब्रुवारी ला मराठी राजभाषा दीना निमित्ताने दरवर्षी अभिनव पद्धति ने कार्यक्रम चे आयोजन करण्यात येते 111 वर्षाची परंपरा असणारे मनमाड सार्वजनिक वाचनालय आधुनिक काळाच्या बरोबरीने कार्य करीत असून वाचनालयामध्ये भव्य असा ई-वाचनालयाचा संगणक कक्ष असून त्यामध्ये संगणक आहेत. या संगणकांवर वाचक सभासदांकरीता इंटरनेट कनेक्शन मोफत असून त्यावर शैक्षणिक, नोकरीविषयक वेबसाईट उपलब्ध आहेत त्याचादेखील तरुण वाचकवर्ग उपयोग करीत आहे. मनमाड सार्वजनिक वाचनालयात अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट, सहसचिव नरेश गुजराथी, संचालक माजी अध्यक्ष, सुरेश शिंदे,, गौतम संचेती, भिकाजी कुलकर्णी, , प्रदीप गुजराथी ही कार्यकारिणी सध्या कार्यरत असून विविध अभिनव संकल्पनेचे कार्यक्रम वाचनालयात शतकोउत्तर वाटचालित राबविण्यात आले. शहरातील सर्व क्षेत्रातील व सर्व स्तरातील नागरिक व वाचकांकडून त्यांच्या जन्मदिनानिमित्त वाचनालयास त्यांनी पुस्तक भेट द्यावी यासाठी वाचनालयातर्फे त्यांना विनंती करण्यात येते अशा देणगीतून वाचनालयात 2010 पासून आज पर्यत 05 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त किंमतीची सुमारे 3700 पेक्षा जास्त पुस्तके संकलित करण्यात आली.तर शासकीय अनुदाना द्वारे सन 2010 ते सन 2025 या कालावधीत सुमारे 17 लाख रुपये किंमती ची 7500 पुस्तके नविन खरेदी करून मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या ग्रंथ संपत्ती मध्ये भरीव व लक्षणीय विक्रमी वाढ झाली आहे मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे विविध सामाजिक ऋण व्यक्त करणारे उपक्रम राबविण्यात आले यामध्ये मनमाड शहरातील सुशिक्षित बेराजगार तरुणांकरीता शिबीर व माहिती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. तर शताब्दी वर्ष निमित्ताने मनमाड शहरात दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये प्रथम येणार्या 03 विद्यार्थ्यांची तसेच मराठी विषयात प्रथम येणार्या विद्यार्थ्यांना पुस्तक गौरव पत्र पारितोषिक देवून गौरव समारंभ संपन्न होत आहे. मनमाड शहरातील गुंतवणुकदारांना मार्गदर्शन होवून आर्थिक साक्षरता व्हावी म्हणून शताब्दी वर्षाच्या निमित्ताने ❗जागो इन्व्हेस्टर जागो ❗या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मनमाड शहरात वाचकवर्गाला सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून विविध मान्यवर प्रकाशकांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड सार्वजनिक वाचनालयाने भव्य ग्रंथप्रदर्शन व भव्य ग्रंथजत्रा शताब्दी वर्षानिमित्त २०१५,व २०१८ मध्ये आयोजित करण्यात आली होती सन २०१६ मध्ये महाविद्यालयींन विद्यर्थि साठी मनमाड़ सार्वजनिक वाचनालय त प्रशस्त मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तक दालन सुरु करण्यात आले याचा अनेक महाविद्यालयीन युवक -युवती मोफत लाभ घेत आहेत सन २०१८ मध्ये प्रसिद्ध कवी स्वर्गीय विंदा करंदीकर यांचे जन्मशताब्दी वर्षा निमित्त मनमाड सार्वजनिक वाचनालय ने राज्य स्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली तील भरघोस प्रतिसाद मिळाला,याशिवाय शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मनमाड शहरात मराठी शिकवणार्या शिक्षक व प्राध्यापकांचा गौरव मराठी दिनाच्या दिवशी वाचनालयातर्फे करुन अभिनव उपक्रम राबविण्यात आला. याशिवाय मनमाड शहरातील विविध साहित्यिक, कवी यांना प्रोत्साहनपर कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते. नवीन बाल व तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून ज्यापध्दतीने शालेय व महाविद्यालयीन जीवनात पर्यटनाची सहल आयोजित होते त्याचपध्दतीने मनमाड सार्वजनिक वाचनालयाने नवीन वाचक निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना सहल वाचनालयाची हा उपक्रम हाती घेतला असून शहरातील मान्यवर शाळा व महाविद्यालयीन शाळांच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून वाचनालयाला भेट देवून वाचनसंस्कृती माहिती करुन घेतली आहे. 2024 ला विध्यार्थी न मध्ये वाचन संस्कृती रुजावी म्हणून मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे शाळेच्या प्रथम दिनी शालेय विध्यार्थी ना पुस्तकं भेट देऊन त्यांचे स्वागत केले यासर्व उपक्रमांसह विविध जेष्ठ मान्यवर थोर दिवंगत साहित्यिकांच्या स्मरणार्थ देखील विविध साहित्यसंबंधी कार्यक्रमांचे आयोजन वाचनालयातर्फे प्रसंगानुसार केले जाते.सन २०२० मध्ये कोरोना चे जागतिक महासंकट असताना मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे ५० वर्षा पेक्षा जास्त कालखंडाची परंपरा असलेली वक्तृत्व व कथाकथन स्पर्धा खंडीत न होऊ देता प्रथमच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली या स्पर्धेला देखील विध्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला तर २०१९-२०२० मध्ये महाराष्ट्र शासना तर्फे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत मनमाड सार्वजनिक वाचनालय ची निवड करण्यात येऊन सुमारे १५००००( एक लाख पन्नास हजार) किंमती ची ५२० स्पर्धा परीक्षा पुस्तके ग्रंथ भेट निधीतून मनमाड सार्वजनिक वाचनालयास मोफत मिळाली ही देखील मोठी गौरवास्पद गोष्ट आहे मनमाड शहरातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक,कामगार धार्मिक क्षेत्रातील तसेच पत्रकारिता क्षेत्रातील सर्व मान्यवरांचा वाचनालयाच्या या महत्त्वपूर्ण शतकोत्तर वाटचालीत मोठा सहभाग ,सदैव मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. साहित्यक्षेत्रातील थोर साहित्यिक व कवी वि.वा.शिरवाडकर (कवी कुसूमाग्रज), विं.दा.करंदीकर यासारख्या दिग्गजांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास सदिच्छा भेट दिली असून ही देखील या वाचनालयाकरीता गौरवाची गोष्ट आहे. मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या सध्या कार्यरत असणार्या संचालक मंडळासह के.जी.कुलकर्णी, दिवंगत गोविंद कर्वे,किशोर नावरकर,दगडूकाका गुजराथी सौ.मंगला गुजराथी, प्रकाश गाडगीळ सर, दिवंगत डॉ.सी.एच.बागरेचा,स्वर्गीय डॉ विद्याधर मालते,स्वर्गीय दिनेश देव, श्रीपाद राजे, सदाशिव सुतार, प्रमोद पांडे या देखील माजी संचालकांनी देखील या वाचनालय च्या ऐतिहासिक प्रवास मध्ये घेतलेले विशेष परिश्रम या मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या या वाटचालीत विशेष उल्लेखनीय आहे. मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने वाचकसंस्कृतीला बळ मिळावे , वाचकांची संख्या वाढावी आणि वाचकांच्या हितार्थ विविध सामाजिक, साहित्यिक कार्यक्रमांचे भविष्यात आयोजन करण्याचा मनोदय वर्धापनदिनाच्या निमित्ताने शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे व सचिव कल्पेश बेदमुथा व सर्व संचालक मंडळ यांनी या स्थापना दिनी व्यक्त केला आहे. मनमाड सार्वजनिक वाचनालय च्या या ऐतिहासिक वाटचालीत सदैव सहकार्य करणाऱ्या वाचक,देणगीदार,हितचिंतक, सर्व कर्मचारी वृंद आणि वाचनालय च्या कार्याला निस्वार्थ पणे आपले लेखनातुन प्रसिद्धी देणाऱ्या सर्व मान्यवर पत्रकार मित्रांचे मनमाड सार्वजनिक वाचनालय सदैव ऋणी आहे नितिन पांडे अध्यक्ष मनमाड सार्वजनिक वाचनालय व्रत अखंड वाचक सेवेचे❗
