
नांदगाव (वार्ताहार )१ मे महाराष्ट्र दिना निमित्त व्हि जे हायस्कुल येथे मा . मुख्याध्याक श्रीः लक्ष्मीकांत ठाकरे सर व मान्यवराच्या उपस्थित ध्वजारोहन करण्यात आलेयानंतर संस्था वर्धापन दिना निमित्त संस्थापंकाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सातवी तु.ड च्या विद्यार्थ्यानी मधुर स्वरात बासरी वादन करून ईशस्तवन सादर केले

.महाराष्ट्र दिनानिमित्त मा.मुख्याध्यापक ठाकरे सर यांनी आपल्या संदेशात महाराष्ट्र राज्याची सामाजिक परिवर्तनातील योगदान व समाज सुधारकाचे योगदान देशाच्या प्रगतील महाराष्ट्राचे स्थान यांची माहिती दिली संस्था वर्धापन निमित्त ना .शि. प्रसारक मंडळाचे ध्येय आता पर्यत वाटचाल व भविष्यातील उपक्रम धोरण याची माहिती दिली

या कार्यक्रमा निमित्त व्यासपीठावर शालेय समिती चे अध्यक्ष श्री.संजीव धामणे , माजी विद्यार्थी मंदार रत्नपारखी मा. मुख्या श्री लक्ष्मीकांत ठाकरे उपमुख्या श्री. सुनिल भदाणे पर्यवेक्षक मिलिंद श्रीवास्तव टि .एम . श्री भास्कर मधे व श्री गुलाब पाटील माजी शिक्षक सांळुखे सर पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते पाहुण्याचा परिचय श्री गुलाब पाटील सर यांनी करून दिला मा मुख्याध्यापक यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले महाराष्ट्र दिन व संस्था वर्धापन दिनाची माहिती सहाय्यक शिक्षक श्री कुणाल जोशी सर यांनी दिली आपल्या भाषणात महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास सांगितला व संस्था स्थापन करण्या मागील संस्था पंकाचा उद्देश ध्येय वाटचाल याची माहिती दिली तसेच संस्थे मार्फत प्रकाशित होणाऱ्या ज्ञानयात्री त्रैमासिककांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

नंतर होमी भाभा व बाल वैज्ञानिक व फंक्शनल इंग्लिश कोर्स या स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवराच्यां हस्ते करण्यात आला अध्यक्षीय भाषणात माजी शिक्षक श्री साळूंखे सर यांनी संस्थेविषयी व महाराष्ट्र दिनाची माहिती सांगितली कार्यक्रमाचे आभार पर्यवेशक श्री मिलींद श्री .वास्तव यांनी मानलेकार्यक्रमाचे सुत्र संचालन क्रिडा शिक्षिका श्रीमती देवरे मॅडम केले .

