
वडांगळी( प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अभिनव बाल विकास मंदिर वडांगळी या विद्यालयात १ मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश दादा खुळे हे होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली. सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाची प्रथम डॉक्टर.डॉ. अनुजा माधव शिंदे व समृद्धी सुदेश खुळे या गुणी व हुशार माजी विद्यार्थ्यीनींच्या शुभहस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश दादा खुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अभिनव बाल विकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब चव्हाणके, रामनाथ बाळाजी खुळे, दिनकर अण्णा खुळे, शांताबाई सुरेश खुळे, विक्रम भास्कर खुळे, विक्रम माधवराव खुळे, रामनाथ रुंजा खुळे, खंडेराव गणपत खुळे, राहुल अरुण खुळे,किरण निमसे, पांडुरंग शिवाजी चव्हाणके, शांताराम कोकाटे, मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार, पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक, सुभाषराव ठोक अभिनव बालविकास मंदिर विभाग प्रमुख शीला आवारे, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख विलासराव तांबे आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यालयाचा गीत मंच व संगीत शिक्षक सचिन सानप यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत तालासुरात सादर केले. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वार्षिक परीक्षा निकाल पत्रकांचे प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक तुकडीतील प्रथम आलेल्या तीन क्रमांकाचे वितरण करण्यात आले.त्याचप्रमाणे अभिनव बाल विकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब चव्हाणके यांच्या शुभहस्ते नुकत्याच झालेल्या एम.बी.बी.एस.च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या व विद्यालयाची पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवलेल्या डॉ. अनुजा माधव शिंदे हिचा यथोचित सत्कार करण्यात आला.तसेच सुदेश दादा खुळे यांच्या हस्ते इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या श्रावणी खुळे हिचा सत्कार करण्यात आला. तसेच कै. राधाबाई रंगनाथ खुळे यांच्या स्मरणार्थ यांचे चिरंजीव राजेंद्र रंगनाथ खुळे यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी व विद्यालयासाठी रुपये 21000 देणगी दिल्याबद्दल आजींचे नातू विक्रम माधव खुळे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष स्थानावरून बोलताना सुदेश दादा खुळे म्हणाले की एक मे 1960 रोजी महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वात आले. तेव्हापासून आपण महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत. तसेच आजच्या दिवशी कामगारांना न्याय व काही अधिकार मिळाले म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगार दिन देखील आज साजरा केला जातो यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे ज्येष्ठ सभासद, पालक ,नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकरराव सांगळे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन बाळासाहेब सांगळे यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
