
सोनांबे ( प्रतिनिधी). सोनांबे जनता विद्यालयात महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण*!!सोनांबे जनता विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला शालेय समितीचे सदस्य देवनदी पतसंस्थेचे चेअरमन बी एम पवार सर यांनी ध्वजपूजन केले तर शालेय समितीचे अध्यक्ष नंदू पाटील पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पालक संघाचे उपाध्यक्ष नितीन पवार शालेय समिती सदस्य निवृत्ती बोडके, गजेंद्र सातपुते, सुनील पवार, कचरू शिंदे, संतोष पवार, अनिल अण्णा पवार, सदाशिव अण्णा पवार, भाऊसाहेब सखाराम पवार, कचरू पाटील पवार,संजय डावरे, अमोल पवार, माजी सैनिक हरी शिंदे,योगेश पवार, भारत पवार,खंडू शिंदे,सचिन शिंदे, पोपटराव पवार,दत्तात्रय शेळके,गणेश शिंदे,अंजली काळूंगे,हिरामण कडभाणे, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे ,पर्यवेक्षक दिगंबर जाधव आदी मंचावर उपस्थित होतेमुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांनी प्रास्ताविक केले.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी 106 जण हुतात्मे झाले.आज त्या सर्वांना अभिवादन करण्याचा दिवस असल्याचे ते म्हणाले.महाराष्ट्र राज्य देशातील आघाडीचे राज्य असून मराठी माणसाने देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोठे योगदान दिले असल्याचे ते म्हणाले.यावेळी विद्यालयातील प्रत्येक वर्गातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुणपत्रक प्रदान करण्यात आले.नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.उपक्रमशील शिक्षिका योगिता शिंदे यांनी विद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदू पाटील पवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना बिरुदेव ढोणे सारखे यश मिळवावे असे आवाहन केले.सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव,क्रीडा शिक्षक दीपक पगारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले पर्यवेक्षक दिगंबर जाधव यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब दहिफळे,कलाशिक्षक मिलिंद पाटील,संवेदीता जाधव यांनी परिश्रम घेतले.यावेळी ज्येष्ठ शिक्षक शांताराम चांदोरे,पंडित चीने,सोपान पवार,जनाबाई सुडके,नवनाथ माळी,किरण पवार, भारती धाकतोडे, रुपावली काळे,मीना केदार,सुहास जुन्नरे,वर्षा मोरे,शबानबी कादरी,योगिता शिंदे,सोनाली देशमुख,रुपाली महाले,रोहिणी पवार,दिपाली घोटेकर,जालंदर कांडेकर,ग्रंथपाल पुष्पा घोटेकर ,सुनील पवार आदींसह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
