
-न्यू मराठा हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करतांना उपस्थित मान्यवर.
नाशिक ( प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे नाशिक शहर संचालक ॲड.लक्ष्मणजी लांडगे होते.व्यासपीठावर शालेय समिती सदस्य उत्तम भदाणे, कृष्णराव शिंदे, मधुकर बिरारी, जयकुमार पवार, बाळासाहेब संधान,माता पालक संघाच्या सविता माळेकर मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर कोतवाल, क्रीडा शिक्षक बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजपुजन, ध्वजारोहण करण्यात आले.प्रास्ताविकातून ज्ञानेश्वर शिंदे यांनी महाराष्ट्र व कामगार दिनाचे महत्त्व सांगुन शुभेच्छा दिल्या तसेच इयत्ता नववी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.प्रमुख अतिथी मनोगतातून मधुकर बिरारी यांनी महाराष्ट्र व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत विद्यालयात इयत्ता नववी त प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या सुत्रसंचलन व आभार सुषमा गिते यांनी केले.फलक लेखन रुपाली शेडगे, मोनिका वडजे, एकनाथ आहेर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सेवकांचे सहकार्य लाभले.
