
सावरगाव ( प्रतिनिधी) आज एक मे महाराष्ट्र दिन सावरगाव शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला ध्वज पूजन गावचे प्रथम नागरिक सरपंच मा.सौ हिराबाई बाबाजी कुशारे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले तदनंतर ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सोमनाथ मनोहर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला शालेय व्यवस्थापन समितीच्या सौजन्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव येथील इयत्ता पहिली ते आठवीतील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समितीच्या स्वखर्चातून पॅड इंग्लिश लर्निंग बुक आणि प्रमाणपत्र इयत्ता पहिली ते आठवीतील प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरपंच शिक्षणप्रेमी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळेस अशोक महाराज कुशारे शिक्षण प्रेमी बाबाजी कुशारे यांनी मनोगत व्यक्त करून शाळेचा विकास जोमाने आणि अतिशय उत्कृष्ट रितीने चालू आहे जिल्हा परिषद शाळेत वर्षभरात राबविलेले विविध उपक्रम आणि नाविन्यपूर्ण गोष्टी यामुळे सर्व गावकऱ्यांचा कल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव कडे वळत आहे आणि चालू शैक्षणिक वर्षापासून स्वर्गातील सर्व विद्यार्थी इयत्ता पहिली ते नववीत टाकावेत असे आव्हान करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील चौगुले यांनी यावर्षी प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळेमध्ये स्पर्धा लागून इतरही सर्व विद्यार्थी जोमाने अभ्यास करून आपले शैक्षणिक जीवन उज्वल करून घेतील असे संकल्प व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमोल झोले सर यांनी केले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील मरगू चौघुले पदवीधर शिक्षक रवींद्र चंदन उपशिक्षक श्री अमोल झोले उमाकांत पवार रवींद्र पवार दत्तू आहेर श्रीमती साक्षी कुशारे मॅडम शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सोमनाथ पाटील अध्यक्ष वैभव कुशारे सदस्य विकास कुशारे, छगन भगरे अमोल मुजगुले माजी उपसरपंच पोपटराव पाटील उपसरपंच श्री अनिल भाऊ कुशारे शिक्षण प्रेमी बाबाजी कुशारे बबनराव कुशारे अंगणवाडी सेविका शालेय पोषण आहार मदतनीस स्वयंपाकी आदी मान्यवर उपस्थित होते
