
मुळ डोंगरी( प्रतिनिधी ) श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्थासंचालित सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी विदयालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा*यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस. जी. राठोड साहेब तसेच संस्थेचे सचिव सिद्धांत दादा राठोड हे अध्यक्ष स्थानी होते. व मुळडोंगरी गावच्या प्रथम नागरिक सरपंच जनाबाई पवार व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस.चव्हाण मॅडम या प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. यावेळी प्रमुख पाहुणेच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. व ध्वज पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. तसेच वर्षभरात झालेल्या स्पर्धा परीक्षा मध्ये विदयालतील विद्यार्थीनी सुयश संपादन केले.आय एम विनर या स्पर्धा परीक्षेत विद्यालयातील इयत्ता सहावी व सातवीतील विद्यार्थी केंद्रात प्रथम द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सर्व विद्यार्थ्यांचे अध्यक्षांच्या व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच सण २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी ते नववीतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ व बक्षीस देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षिका श्रीमती शीतल माळी मॅडम यांनी केले. या वेळी सर्व शिक्षक,शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
