
वाखारी ( प्रतिनिधी )किसान माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि ना. शि. प्र. मंडळ वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला* मुख्याध्यापक श्री. खालकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगताततून महाराष्ट्र दिन, कामगार दिन, ना. शि. प्र. मंडळ वर्धापन दिन याविषयीची माहिती दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या मा. संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. माजी शिक्षक श्री पोपट चव्हाण सर यांनी संस्थेचा 107 वर्षाचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला.

त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते *ज्ञानयात्री त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले.* वर्गात प्रथम दोन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुणपत्रक देण्यात आले. याप्रसंगी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री. भाऊसाहेब सोनवणे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. भाऊसाहेब खैरनार हे उपस्थित होते. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना निकाल आणि ज्ञानयात्री वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर डी पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील हिंगमीरे, प्रशांत वाघ, नंदू दवांगे, रोहिणी गोराडे, दिलीप भडांगे, ज्योत्स्ना चव्हाण, योगेश कुलकर्णी, ऋषी डोमाडे यांनी प्रयत्न केले.
