
मखमलाबाद विद्यालयात महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करतांना मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे व उपस्थित सर्व मान्यवर
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.याप्रसंगी व्यासपिठावर अभिनव स्कुल कमिटी अध्यक्ष निवृत्ती महाले,होरायझन स्कुल कमिटी अध्यक्ष शंकरराव पिंगळे,ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड सर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष वाळू काकड,स्कुल कमिटी सदस्य जेष्ठ सभासद चंद्रभान पिंगळे,परसराम पिंगळे,सुभाष तिडके,माजी मुख्याध्यापक शंकरराव पिंगळे,माजी खेळशिक्षक विलास मोरे,शिवाजी पिंगळे,आत्माराम भोर,विक्रम कडाळे,भास्कर तांबे,प्रमोद शिंदे,प्राचार्य संजय डेर्ले,अभिनवचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे,कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.मनिषा आहेर,उपप्राचार्या विमल रायते,पर्यवेक्षक सुनील पाटील,ज्युनियर काॅलेज प्रमुख विकास थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते शिवपुतळा व सरस्वती पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.प्राचार्य संजय डेर्ले यांनी प्रास्ताविक केले.प्रास्ताविकात त्यांनी शालेय प्रगतीचा आढावा घेतला.महाराष्ट्र व कामगार दिनाचे महत्व सांगुन सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच सर्व मान्यवरांचे,पालकांचे आभार मानले.एन.सी.सी.सी.एच.एम.किमेश ह्याळीज याने कार्यक्रमाचे अध्यक्ष मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.व त्यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या शालेय गीतमंचाने राष्ट्रगीत व राज्यगीत सुरेल आवाजात सादर केले.मखमलाबादचे भूमिपुत्र सेवानिवृत्त तहसिलदार उदय केशवराव मोरे,सेवानिवृत्त एसीपी राष्ट्रपती पदक सन्मानीत नंदकिशोर केशवराव मोरे,सेवानिवृत्त खेळशिक्षक विलास केशवराव मोरे या सर्व मोरे बंधुंतर्फे त्यांची आई कै.वत्सलाबाई केशवराव मोरे यांच्या स्मरणार्थ विद्यालयास साऊंड सिस्टीमसाठी २५०००/- हजार रु.देणगी देण्यात आली.विद्यालयाच्या उपप्राचार्या विमल रायते यांनी सार्वजनिक वाचनालयासाठी ५०००/- रु.देणगी वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे यांच्याकडे सुपूर्द केली.जेष्ठ शिक्षिका रोहीणी सोनवणे यांनी विद्यालयाच्या वाचनालयास १६ पुस्तकांचा संच भेट दिला.या सर्व दानशूर व्यक्तिंचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.अभिनव बालविकास मंदिर या शाळेस आय.एस.ओ.मानांकन मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.इ.५ वी ते ९ वी मधील प्रथम तीन क्रमांक,सकाळ एनआयई चित्रकला स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते गुलाबपुष्प व गुणपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.अभिनव स्कुल कमिटी अध्यक्ष निवृत्ती महाले यांनी आपल्या मनोगतात स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिंना उजाळा दिला.विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करुन मोठमोठ्या पदावर यश संपादन करावे अशाही शुभेच्छा त्यांनी दिल्या.अध्यक्षीय मनोगतात मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांनी महाराष्ट्र व कामगार दिनाचे महत्व सांगितले.महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिंना उजाळा दिला.तसेच सर्व विद्यार्थी,पालक व शालेय परिवाराला महाराष्ट्र व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.ज्येष्ठ शिक्षिका सविता आहेर यांनी सूत्रसंचालन केले.जेष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी आभार मानले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी,एन.सी.सी.आर्मी व नेव्हलचे विद्यार्थी,शालेय विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

