
सिन्नर ( प्रतिनिधी ) निसर्ग देवतेच्या कृपेने आदिम लगिन कार्य . आदि दादाभाऊ तुकाराम इदे रा पिंपळदरावाडी ( एकदरे ) ता.अकोले जि.अहिल्यानगर यांचा मुलगा व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष आदि.रामुदादा तुकाराम इदे यांचे पुतणे नवरा रविंद्र तसेच आदि.रामदास वाळीबा लेंडे रा.बाभूळवंडी ता.अकोले जि.अहिल्यानगर यांची मुलगी नवरी रेणुका यांचा लगिन कार्य बाभूळवंडी ( खालची )ता.अकोले येथे* धरतीमातेचे पुजन करून व क्रांतिकारक महापुरुषांना अभिवादन करून लगिन कार्य बाभूळवंडी ता. अकोले येथे संपन्न झाले.

आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी व क्रांतिकारक महापुरुषांचे विचार व त्यांची ओळख समाजाला व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन लगिन कार्य आयोजित केला.नवरा नवरीने लगिन होण्या अगोदर धरतीमातेची सूर्य चंद्र डोंगर पशू पक्षी यांच्या प्रतीकृतीचे व वृक्षाचे पुजन करून क्रांतिकारक महापुरुषांना अभिवादन केले. आदिवासी समाज हा निसर्गाला मानणारा निसर्ग पुजक आहे.आदिवासी संस्कृती टिकवने ही प्रत्येक आदिवासी माणसाची जबाबदारी आहे.बाभूळवंडी भागात प्रथमच आदिम लगिन कार्य पार पडले

त्यामुळे निसर्ग पुजक लगिन कार्य प्रत्येक ठिकाणी झाले पाहिजेत अशी उपस्थितांनी भावना व्यक्त केली.या लगिन कार्यात अक्षदा म्हणून तांदळा ऐवजी फुलांचा वापर करून अन्नाची नासाडी करू नये हा संदेश उपस्थितांना देण्यात आला. तसेच, उपस्थित नातेवाईक व मित्रपरिवार यांनी नवरा नवरीला आशिर्वाद देऊन आदिम लगिन कार्याचे कौतुक केले.आदिवासी सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते पुंडलिक भांगरे व लक्ष्मण तळपे यांनी आदिम लगिन कार्य ची पुजा विधी मांडणी केली.सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ मुठे यांनी आदिम लगिन कार्य बद्दल प्रबोधन केले.व लगिन कार्यासाठी अ.भा आदिवासी विकास परिषद नवीन दिल्ली राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव व सेवानिवृत्त नायब तहसीलदार महामिञ दत्ता वायचळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे ( शरदचंद्र पवार गट ) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.राजाराम मुरकुटे सिन्नर यांनी मोबाईल द्वारे नवरा – नवरीला सदिच्छा देण्यात आल्या.या आदिम लगिन कार्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी बाभूळवंडी गावचे उपसरपंच पांडुरंग लेंडे, पिंपळदरावाडी चे माजी सरपंच पांडुरंग भांगरे,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे संस्थापक रामु इदे, सहसंस्थापक विजय मुठे, लक्ष्मण तळपे, पुंडलिक भांगरे ,गोविंद कवटे विठ्ठल चौरे विठ्ठल म्हशाळ,इदे व लेंडे परिवाराचे आप्तेष्ट नातेवाईक मिञ परिवार व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

.
