
गणुर.( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्याकर्म.ॲड.बी. जी. ठाकरे जनता विद्यालय गणुर ता. चांदवड शाळेत *१ मे महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम महाराष्ट्र दिन* व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय समिती अध्यक्ष श्री अशोक काका सवंद्रे यांच्या अध्यक्षतेत ध्वजाचे ध्वज पूजन शालेय समिती सदस्य श्री आनंद तुकाराम ठाकरे व ध्वजारोहण शालेय समिती सदस्य श्री हरिचंद्र गाऊबा ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शालेय समितीचे सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, पालक, मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी इयत्ता ५ ते ९ वी च्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय समिती अध्यक्ष व सदस्यांकडून अभिनंदन करण्यात आले.
