
मोरेवाडी ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी येथे महाराष्ट्रदिन / कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे ध्वजारोहण शाळेच्या शिक्षिका योगिता कापुरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी राष्ट्रीयध्वजास सलामी देण्यात येऊन राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र गीताचे सामुदायिक गायन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक बागुल सर यांनी महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा उपस्थितांना समजावून सांगितली.

सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ महिला भीमबाई मोरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, उपाध्यक्ष नवनाथ पवार,पालक सदाशिव मोरे,अंगणवाडी कार्यकर्ती सुनीता राठोड, स्वयंपाकी जिभाऊ मोरे ,मदतनीस रंजना मोरे व विद्यार्थी आदी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे चावडी वाचन घेण्यात आले. उन्हाळी सुट्टीतील कृतिपुस्तकांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थांना करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बागुल सर यांनी केले,तर योगिता कापुरे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करून कार्यक्रमाचा गोड करण्यात आला.

