
महाराष्ट्र दिनाबरोबरच आज कामगार दिवस देखील आहे.दरवर्षी १ मे जागतिक कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो.सतराव्या शतकाच्या मध्यात सुरु झालेल्या औद्योदिक क्रांतीने युरोपमध्ये एक नवी युगाती सुरुवात केली होती. मात्र या नवीन युगाबरोबरच नव्या समस्याही उदयास आल्या. त्यातील एक समस्या होती कामगरांची. युरोपात औद्योगिक क्रांतीला सुरुवात तर झाली मात्र कामगार वर्गाचे शोषण वाढीस लागले. त्यावेळी कामाचे तास हे आठ दहा नव्हते. तर कामगारांना तब्बल १५ तास काम करावे लागे. त्यातल्या त्यात जनावरासारखं काम करून मोबदलाही मिळत नव्हता. मात्र मजुरांनी याविरोधात आंदोलन पुकारलं. कामगारांच्या या पाऊलाने जगाच्या पाठीवर कामगारांचा नवा इतिहास कोरला गेला.आजच्या दिवशी अमेरिकेत कामगारांनी ७ तासांचे काम असावे अशी मागणी केली होती. ऑस्ट्रेलियात ही चळवळ पुढे आठ तासांचा दिवस म्हणून ओळखली जाऊ लागली. २१ एप्रिल हा दिवस तेव्हापासूव ऑस्ट्रेलियात कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.मात्र १ मे रोजी ऑस्ट्रेलियात थरारक घटना घडली. युनायटेड स्ट्रेट्समधील कामगारांनी आठ तास कमा करण्याचे आवाहन पुकारले. मागण्यांसाठी संप आणि मोर्चे निघाले.मात्र त्यावेळी झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी ट्रकने हुसकावून लावले. या घटनेने कामगारांतील संताप आणखी वाढला. प्रतिउत्तर म्हणून पोलिसांवर बॉम्बस्फोट करण्यात आले. यात ७ पोलिस आणि ४ नागरिकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आठ जणांना अटक होऊ फाशीची शिक्षा सुणावण्यात आली. या घटनेने जगभर संताप व्यक्त झाला. कारण या ८ जणांपैकी कोणीही बॉम्ब फेकले नसल्याचे सांगण्यात येत होते.अशा प्रकारे या रक्तरंजित आंदोलनानंतर.१ मे १९८० रोजी कामगार चळवळ यशस्वी झाली. न्याय्य वेतन, चांगली वागणूक, पगारी रजा आणि ८ तास काम या मागण्या मान्य करण्यात आल्या. तेव्हापासून हा दिवस अमेरिकेत कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.कष्ट करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा एक गंभीर आणि महत्त्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी कामगारांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. कामगारांना सुरक्षित कामाचे वातावरण मिळण्याचा हक्क आहे, जो कायद्याने सुनिश्चित केला जातो.मात्र कामगार ज्या ठिकाणी कार्य करतात तो परिसर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनुकूल नसतो व कामगार कायद्याचे पालन देखील केले जात नाही. अनेक कामगारांचा मृत्यू बेजबाबदार पणामुळे व दुर्लक्षित कारणांमुळे होतो.कामगार कायद्यांचे योग्य पालन करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणेकामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्य विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कामगारांना आवश्यक ती सुरक्षा उपकरणे (उदा. हेल्मेट, सुरक्षा बूट, इत्यादी) पुरवणे आवश्यक आहे. कामगारांमध्ये सुरक्षिततेची जाणीव वाढवणे आणि त्यांना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. तसेचकामाच्या ठिकाणी नियमितपणे सुरक्षा तपासणी करणे आणि धोक्यांची शहानिशा करणे आवश्यक आहे. याशिवायकामगार संघटनांना कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. असंघटित कामगारांना (उदा. घरगुती कामगार, बांधकाम कामगार, कृषी कामगार) कायदेशीर आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण मिळवून देणे आवश्यक आहे. बालमजुरी आणि बंधपत्रित मजुरांना रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलणे आवश्यक आहे. कामगारांचे स्थलांतर ही एक फार मोठी समस्या आहे.स्थलांतरित कामगारांना योग्य निवास, आरोग्य सुविधा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अनेक कारखान्यात व कंपन्यांमध्ये स्त्रिया वृद्ध व लहान बालकांना कामावर घेतली जातात.स्त्रिया आणि वृद्ध कामगारांना योग्य संरक्षण आणि सुविधा मिळवून देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून कामाच्या ठिकाणी सुरक्षितता वाढवता येते, उदा. रिमोट कंट्रोल, सुरक्षा कॅमेरे, इत्यादी. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कायदे करण्यात आले असले तरी कामगारांची सुरक्षितता हा अतिशय जटिल व तितकाच चिंताजनक प्रश्न आहे.कामगारांना सुरक्षा कधी मिळेल हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे ज्याचे थेट उत्तर नाही. कामगारांची सुरक्षितता त्यांचा व्यवसाय, त्यांची कंपनी आणि त्यांच्या सरकारने बनवलेले नियम आणि कायदे अशा विविध घटकांवर अवलंबून असते.सरकार कामगारांचे संरक्षण करण्यासाठी अनेक प्रयत्न करते, जसे की सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणे, कामगारांचे आरोग्य तपासणे आणि कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणे. परंतु, कामगारांची सुरक्षा ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. कामगारांनी स्वतःच्या सुरक्षिततेची जाणीव ठेवली पाहिजे आणि सुरक्षित कामाच्या पद्धतींचे पालन केले पाहिजे.कामगारांना सुरक्षा कधी मिळेल, हा एक सतत प्रयत्न आहे. कामगारांना सुरक्षित आणि निरोगी कामाचे वातावरण मिळावे यासाठी सरकार, मालक आणि कामगार यांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे.९५६१५९४३०६
