
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८९३ वा दिवस स्वतःचा मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी, हेवेदावे आणि इतरांचा मत्सर या साऱ्यांचा तुम्ही कायमचा त्याग करावा हीच तुमच्या पासून अपेक्षा आहे. आपल्या बंधूंशी, आपल्या सहकार्यांशी सर्वदा सहमत होण्यासाठी तयार राहिले पाहिजे आणि त्यांच्याशी नेहमी जुळते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संघटित होऊन कार्य करण्याचे हेच रहस्य आहे. पृथ्वी मातेप्रमाणे सहनशीलता तुमच्या ठायी बाणली पाहिजे. असे जर होईल तर सारे जग तुमच्या पायाशी लोळण घेईल.
स्वामी विवेकानंद… *●आपला दिवआनंदमय, मंगलमय होवो●
भारतीय सौर ११ वैशाख शके १९४७*
★ वैशाख शुध्द /शुक्ल ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १ मे २०२५
★ १८९७ स्वामी विवेकानंद यांनी शैक्षणिक, धार्मिक व परमार्थिक अध्ययनासाठी “रामकृष्ण मठ/मिशनची” स्थापना केली.
★ जागतिक कामगार दिन…
★ १९६० महाराष्ट्र दिन…. “
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा” I”प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा” IIII महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा II 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


