
सिन्नर( प्रतिनिधी ) महात्मा बसवेश्वर व राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची संयुक्त जयंतीनिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने त्यांना सिन्नर येथे अभिवादन करण्यात आलेया कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर व राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आली*या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की*महात्मा बसवेश्वर* महामानव, विश्वगुरू, परिवर्तनवादी सत्पुरुष, लिंगायत धर्म संस्थापक, सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक, थोर समाजसुधारक, वर्गविरहित समाज निर्माता जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांचे १२ व्या शतकात आध्यात्मिक, वैचारिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात मोठं योगदान आहे.अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. त्यातून समाज अधोगतीच्या मार्गावर जातो, हा विचार म. बसवेश्वरांनी रयतेला दिला. डाॅ.श्यामसुंदर झळके म्हणाले की या पार्श्वभूमीवरच त्यांनी तत्कालिन जुनाट रूढी- प्रथांविरुद्ध आपली भूमिका परखडपणे मांडली. त्याजागी ज्ञान-भक्ती-कर्म या त्रिसूत्रीचा अंगिकार करून कर्मकांड, अंधविश्वास, जातीभेदाविरुद्ध जनमत उभे केले. सत्य, अहिंसा, दया, सदाचार, शील या सद्गुणांचा अंगिकार करा. भूतदया बाळगा. जातीपातीवर विश्वास न ठेवता इतरांबद्दल सदभावना ठेवा, आत्मस्तुती करू नका. दुसऱ्यांची निंदा नालस्ती करू नका. खोटे बोलू नका. चोरी करू नका. हत्या करू नका, परोपकारी व्हा म्हणजे हीच खरी अंतरंगशुद्धी व बाह्यशुद्धी आहे. ही तत्वे त्यांनी लिंगायत धर्मात बिंबवली. तत्कालिन समाजातील प्रचलित उच्च – नीचता, स्त्री दास्यत्व, स्त्री-पुरुष असमानता या अनिष्ट चालीरितींविरुद्ध वाचा फोडून बसवेश्वर हे चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरुद्ध सर्व शक्तीनिशी उभे राहिले. जातीच्या आधारावर भेदभाव करू नका. अशा महान परिवर्तनवादी सत्पुरुष विनम्र अभिवादन तसेच विजय मुठे म्हणाले की*तुकडोजी महाराज* हे महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. “आते है नाथ हमारे” हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.गाडगे महाराज सोबत तुकडोजी महाराज भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची विचारसरणी होती.काॅम्रेड हरिभाऊ तांबे म्हणाले की समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.अशा या महान विचारवंत परीर्वतन वादी यांना विनम्र अभिवादन या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश माळी,यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले तर सोमनाथ लोहारकर आभार यांनी मानले याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,काॅम्रेड हरिभाऊ तांबे,डाॅ श्यामसुंदर झळके,प्रकाश माळी, मनोज माळी नामदेव कुटे राजेंद्र देशमुख, राजेंद्र सातपुते,भाऊशेठ भाटजीरे, सोमनाथ लोहारकर, धनंजय परद
