
नासिक रोड-( प्रतिनिधी ) हिंदु धर्मात येणारे सण संस्कार प्रदान करतात. चैत्र महिन्यात चैत्र गौर आपल्या माहेरी येते. साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा व अक्षतृतीया हे दोन मुहूर्त या महिन्यात येतात. महिनाभर चालणारा हा उत्सव असतो. यानिमित्त कैरीची डाळ व पन्हे हे ऋतुचक्रानुसार येणारे पदार्थ केले जातात. व त्याचा आस्वाद घेतला जातो. ब्राह्मण सभा नाशिक रोड संस्था ही दिनविशेष महत्व कार्यक्रमातून दाखविणारी समाजाभिमुख संस्था आहे असे गौरवोद्गार सौ.अलका कुळकर्णी, नासिक च्या प्रसिद्ध लेखिका यांनी भारतीय सण या व्याख्यानात काढले.

व्यासपीठावर श्री सुहास भणगे, कार्यवाह, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक, श्री झुंबरलाल उपाध्ये, नासिक रोड मधील नामवंत टॅक्स कन्सल्टंट, मुकुंद कुलकर्णी, अध्यक्ष, ब्राह्मण सभा नाशिक रोड, मंदाकिनी शेरीकर, महिला विभाग प्रमुख, सुरेश कुलकर्णी, उपाध्यक्ष व राजीव व्यवहारे, कोषाध्यक्ष हे उपस्थित होते.

प्रारंभी अनघा जोशी यांनी स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्रास्ताविक अनघा कुळकर्णी केले. मांन्यवरांचा शाल बुके देवून सत्कार करण्यात आला.

सुहास भणगे व झुंबरलाल उपाध्ये यांनी ब्राह्मण सभा नाशिक रोड तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात व त्याला ज्ञाती बंधू-भगिनींचा छान प्रतिसाद असतो याबद्दल कौतुक केले.

सिंहस्थ २०२८ पुर्वी ब्राह्मण सभा, नासिक रोड इमारत नियोजित तीन मजली बांधकाम पुर्ण करणेसाठी दानशूर व्यक्तीं संस्थांनी पुढे येवून सिंहस्थासाठी इमारत लोकार्पण करणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन मुकुंद कुळकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

सर्व उपस्थित महिलांना गुलाब पुष्प देवून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
सुत्रसंचलन सौ.मेखला रास्वलकर यांनी केले व आभार प्रदर्शन राजीव व्यवहारे यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता हळदी कुंकू , कैरी डाळ व थंडगार पन्हे वाटप करुन झाली.
कार्यक्रमास सर्व ज्ञाती बंधू-भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.मंजुषा ताथोडे, सौ.भारती देशपांडे, अनघा जोशी, मंदाकिनी शेरीकर, मुग्धा कुलकर्णी, अनघा कुळकर्णी, निशा कपोले, शुभदा देशपांडे, शोभना व्यवहारे, सुरेश कुलकर्णी, राजीव व्यवहारे, यांनी विशेष परिश्रम घेतले.
