
-दोंडाईचा-( प्रतिनिधी )सध्या शहरात कुठेना कुठे रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.त्यात ही कामे करताना जी निष्काळजीपणा व झाडाची कत्तले करून सिमेंटच्या चादरी बसविण्यात येत आहे. ह्या सिमेंटच्या चादरीने संबधितांचे आयुष्य तर दिर्घायुष्य होईल पण झाडी तोडली गेल्याने शहरातील किती लोकांचे आयुष्य ह्या रोड बनवण्यासारखे वर्षानुवर्षे रिपेरिंग करावे लागणार आहे, हया लहानशा गोष्टीचा विचार ना प्रशासन ना ठेकेदाराकडून केला जात आहे.कर भला तो हो भला ह्या वुत्तीप्रमाणे रोडांच्या कामाला संथ गती दिली जात असल्याचे, गावातील जाणकार नागरिकांमध्ये बोलले जात आहे. येथे स्टेशन भागातील नंदुरबार चौफुलीला जोडणारा मध्यवर्ती रस्त्याच्या कामाला मागील दोन महिन्यांपासून सुरूवात करण्यात आली आहे.ह्या रस्त्यावर मागील पाच सात वर्षात मेहनत घेऊन जी झाडे जगवीली गेली होती.ती झाडे ठेकेदाराने रात्रीतुन कोणताही गाजावाजा न करता जेसीबी लावून क्षणात जमीनदोस्त करण्यात आली आहे.त्यावेळेस जनमतने कत्तली झालेल्या झाडांचे फोटो व्हिडिओ काढत,संबधित ठेकेदाराला झाडे कोणत्या नियमाने तोडली गेली असे विचारले असता.मात्र त्या ठेकेदाराने लोकल पुढारीच्या पंटरचे नाव घेत,त्याला जावून भेटा आम्हाला रितसर रस्त्याच्या कामात आडकाठी येणाऱ्या झाडे काढण्याची परवानगी दिली आहे.तुमच्याकडे जी ही काही फोटो व्हिडीयो असतील त्यांना दाखवा असे ठणठणीत आवाजात प्रतिउत्तर दिले.म्हणून आज हा रस्ता जरी क्राक्रींटीकरण करण्यात येत असला-सिमेंटची चादर टाकण्यात येत असली तरी हा रस्ता मागील दहा वर्षात हा नेता येतो आहे,तो नेता येत आहे, ह्या कारणांमुळे कितीवेळा रंगरंगोटी करण्यात आला आहे-किती आयुष्य असेल,हे अनेकांना लक्षात येईल व आता काय करोड रूपये खर्च केले जात आहे,हे फक्त ठेकेदार व प्रशासक यांनाच माहिती आहे.त्यामुळे अशी कामे घेता-देताना ऐवढेच पाहिले जात असते,कर भला तो हो भला! मग झाडे कत्तली करत जनता को सिमेंट -पाणी रोज जरा जरा पिला! अशी वुत्ती ठेकेदाराच्या स्व-विकास कामातुन दिसत आहे.शहरात आज मितीला ह्या कामासह अमरावती नदी पुल,सिंधी कालनी मधील रस्ता ,मानराज हाॅटेल मागील सब्जीमंडी रस्त्यांचे काम आदी संथ गतीने कामे सुरू आहेत.ह्या कांमाचे ठेके देताना बाहेरील ठेकेदांरांना जरी कामे कागदोपत्री दिली असली.तरी मात्र देखरेख व मलाईची जबाबदारी लोकल पंटर यांच्याकडेच राखून ठेवली असल्याने रस्त्यांचे काम निश्चितच रबडी सारखे होईल व एक पाऊस जरी पडला तरी अमरावती नदीत रबडीचा महापुर वाहून जनतेला आपल्याच पैशाची कशी विल्हेवाट लावून,त्रास युक्त रबडीचा आस्वाद घेता येईल,असेच ठेकेदारांच्या वागणुकीवरून दिसत असल्याचे गावातील रस्ते कामांवर लक्ष ठेवून असलेल्या जाणकार नागरिकांकडून म्हटले जात आहे.
