
नांदगाव (प्रतिनिधी) जम्मू काश्मीर खोऱ्यात पहलगाम येथै झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी नांदगाव बंद करण्यात आला शहरातील व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त आपली दुकाने बंद ठेवून नांदगाव शंभर टक्के बंद होते यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात येऊन पाकिस्तानचा ध्वज दहन करण्यात आला यावेळी हल्ल्यात मृत झालेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून येथील हुतात्मा चौकात पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना निवेदन देण्यात आले.

पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने नांदगाव शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. शहरातील सर्वच व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदवला यामध्ये प्रामुख्याने शहरातील मेडिकल हॉस्पिटल दूध डेरी या अत्यावश्यक सेवा मात्र सुरू होत्या शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी संस्कृतीने आपले सर्व व्यवहार बंद ठेवले येथील हुतात्मा चौकात दुपारी चार वाजता पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला व यानंतर पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी नांदगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी देखील पहेलगाम हल्ल्याचा निषेध करून त्यांनीही निवेदन दिले

तसेच केंद्र सरकारने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद खेचून काढावा असे या निवेदनात नमूद केले आहे याप्रसंगी याकूब शेख,अकिल मास्टर टेलर,आरिफ मन्सूरी,समत मन्सुरी,लल्लू टेलर,साजित तांबोळी, वाल्मीक जगताप सर, मुस्ताक शेख,अय्याज शेख,जहिर अली,सलीम शेख,शमशाद मिस्तरी,राजु गुढेकर,एकबाल शेख आदी उपस्थित होते.
