
सिन्नर ( प्रतिनिधी)डुबेर येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेत थोरले बाजीराव पेशवे यांची २८५ वी. पुण्यतिथी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेत साजरी करण्यात आली प्रथमतः पेहेलगाम काश्मीर येथे आतंकवादी भारताच्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष चेअरमन श्री नारायण शेठ वाजे व्हाईस चेअरमन श्री अरुण शेठ वारूंगसे, जनसंपर्क संचालक श्री शंकरराव वामने कार्यकारी संचालक श्री महेश कुटे, महामित्र श्री दत्ताजी वायचळे डुबेर चे सरपंच श्री रामनाथ पावसे उपस्थित होते तसेच पुण्याहून आलेले श्री संजय पटवर्धन श्री सचिन कचेरीकर श्रीमंत पतसंस्थेचे संचालक श्री गणेश वाजे श्री आनंद सहाणे श्री काशिनाथ आप्पा वाजे प्राध्यापक एकनाथ माळी श्री गोरख ढोली श्रीविष्णू भालेराव श्री दामू कुंदे सौ मीराबाई कुरणे सौ संगीता वाजे श्री म्हसू पवार,ॳॅड. प्रदीप वारुंगसे, श्री पोपट रहाटळ, विविध कार्यकारी सोसा.चेअरमन श्री अशोक गवळी माजी सरपंच श्री शरद माळी पोलीस पाटील श्री रामदास वारुंगसे श्री लक्ष्मण वाजे श्री पंडित माळी श्री रमेश वाजे उपस्थित होते पेशव्यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले श्री चंद्रशेखर बर्वे यांनी प्रास्ताविक केले

त्यांनी पेशव्यांनी केलेली ऐतिहासिक कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजा नंतर साम्राज्य वाढविण्यासाठी केलेले कार्य याबाबतची माहिती दिली श्री महामित्र दत्ताजी वायचळे यांनी आपले विचार व्यक्त करताना महापुरुषांना कोणत्याही जाती धर्मात न बांधता त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करून आदर्श समाज बांधणी केल्यास आदर्श समाज निर्माण होण्यास मदत होईल व श्रीमंत पतसंस्था गेल्या अनेक वर्षापासून जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करीत असल्याने त्यांनी श्रीमंत परिवारात चे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आयुब शेख यांनी केले उपस्थितांचे आभार सरपंच मा.श्री रामनाथ पावसे यांनी मानले.
