
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८९० वा दिवस हे सर्व विश्व म्हणजे जणूकाही ईश्वराची बाह्य प्रतीक आहे. प्रत्येक विशिष्ट शरीर म्हणजे एक रुप आहे. आणि त्या विशिष्ट रुपाच्या पाठीमागील त्याचे विशिष्ट नाव आहे. हे विश्व तरी दुसरे काय आहे? ते सुद्धा नामरूपात्मकच आहे. शब्द आणि विचार हे अविभाज्य आहेत. आपण जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा तेव्हा आपण तो शब्दाच्या साह्याने करतो. विचार शब्दाला घेऊन येतो आणि शब्द विचार आणतो. म्हणून आपले विचार दुसऱ्यांच्या ह्रदयाला थेट भिडले पाहिजेत. विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी संरचना निर्माण झाली पाहिजे. विचारातून व्यक्ती कार्यप्रवण झाली पाहिजे.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर ८ वैशाख शके १९४७
*★ वैशाख शुध्द /शुक्ल १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २८ एप्रिल २०२५
★ १७४० अटकेपार झेंडे फडकावणारा मराठा साम्राज्यातील सर्वात कर्तबगार पेशवा हिंदू सैनिक सम्राट थोरले बाजीराव पेशवे यांचा स्मृतीदिन.
★ १८५४ लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी चित्रशाळेचे विश्वस्त, वासुदेव गणेश जोशी तथा वासुकाका यांचा जन्मदिन
★ १९४५ इटलीचा हुकूमशाहा बिनेटो मुसोलिनी यांचा स्मृतीदिन.


