
विंचूर दि.२७ (प्रतिनिधी) २२ एप्रिल रोजी काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या क्रुर हल्ल्यात २६ निरापराध भारतीयांची हत्या केली.या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ विंचूरकर ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवला. अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व व्यवसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद मध्ये सहभाग घेतला होता. विंचूर, हनुमान नगर, विष्णू नगर, सुभाष नगर, कृष्णवाडी, विठ्ठलवाडी येथील सकल हिंदू समाज व सर्व पक्षांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भवानी पेठ ते पोलीस चौकी पर्यंत मुकमोर्चा काढण्यात आला.यावेळी निरापराध भारतीयांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी अतिरेक्यांना कठोर शासन व्हावे.

अशा आशयाचे निवेदन लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांना देण्यात आले.यावेळी ओम शेवाळे, समाधान कापसे, सोमनाथ गायके,कैलास सोनवणे, हर्षल काळे,निलेश सालकाडे आदींनी आपल्या मनोगतातून सदर घनेचा निषेध व्यक्त केला. व हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. यावेळी विंचूर ग्रामपालिकेचे सरपंच सचिन दरेकर, कैलास सोनवणे, निलेश सालकाडे, राजेंद्र पारिख, ज्ञानेश्वर शिरसाट, हर्षल काळे, राजेंद्र मोरे, योगेश खुळे, सुनिल नेवगे, सोहेल मोमीन, इरफान मणियार, मोहसीन शेख,गोरख गांगुर्डे, ललित सोनी, तुषार दरेकर,ओम शेवाळे, विक्रम पवार, सोपान नेवगे, संजय धनवटे, बाबाजी पाटील, रमेश गुंजाळ, दिलीप सोनवणे, प्रशांत सरोदे, राजेश भडांगे, प्रज्वल गायकवाड, विलास दरेकर, निलेश बोथरा, दिपक राऊत, ज्ञानेश्वर खांदोडे, किरण शिरसाट, किरण नेवगे, सचिन जेऊघाले,यश चौधरी, विकी काळे, आकाश जाधव, मनोज शिरसाट, धनंजय गांगुर्डे,अभिजित जाधव, महेश शिंदे,हरी ओम परदेशी, सुनिल घोडके, दिलीप बोथरा,पारस शिरसाट, सत्यम काळे, लड्डूराजे शिरसाट,यश पारिख,नारायण देसले, शैलेश गायकवाड, रोहित भट्टड, दिपक पुंड,अक्षय सोनी, अजय मानकर अक्षय जंगम,केतन नाबरा आदी उपस्थित होते. बंद शांततेत पार पडला.
