
मनमाड (प्रतिनिधी)रविवार दि. २७/४/२०२५ रोजी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान येवला तालुक्यातील कात्रा किल्ला शेजारी बुधल्या डोंगराला फाॅरेस्टला मोठ्या स्वरूपात आग लागल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिल्यानंतर शर्थीचे प्रयत्न करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आगीचा वनवा मोठ्या प्रमाणात पसरला असल्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न युवकांनी जीव धोक्यात घालून शर्थीचे प्रयत्न केले.

या आगीत जंगलातील पशु पक्षी व प्राणी संकटात. सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी मनमाड येथील अग्निशमन दलाचा फोनही लागत नव्हता त्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रयत्न करत होते. याबरोबरच वन विभागाचे कर्मचारी अंकुश गुंजाळ, भाऊसाहेब झाल्टे, कातरवाडी येथील वन्य पशु प्राणी मित्र भागवत झाल्टे,सागर गांगुर्डे, विष्णू कोल्हे,दत्तु कदम,संजय कदम हे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.व रात्री दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर साडे आठ वाजता आग आटोक्यात आणण्यासाठी चे येथील तरुणांना यश आले.

