
डोंबिवली येथील कवी विजय जोशी (विजो) यांच्या ‘बाया’ या कवितेचा आजवर ५०+ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे आणि या जागतिक विक्रमाची नोंद WORLD RECORDS BOOK OF INDIA या संस्थेने घेतली आहे.अनुवादीत ५०+ भाषांमध्ये मराठीच्या विविध बोलीभाषा, भारतातील विविध प्रादेशिक भाषा आणि काही जागतिक भाषांचाही समावेश आहे.यापूर्वी विंदा करंदीकर यांच्या ‘विठ्ठल’ या कवितेचा ३० बोलीभाषा आणि इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे. आणि कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ या कवितेचा २२ बोलीभाषा आणि इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे, अशी नोंद सापडते.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना, एका मराठी कवितेचा जागतिक विक्रमी संख्येने अनुवाद होतो हा -मराठी भाषेसाठी, साहित्यासाठी, आपणा सर्व साहित्यिक, रसिक, वाचक यांच्यासाठी आणि विजय जोशी यांच्या साठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.या जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र लवकरच या संस्थेकडून विजय जोशी यांना प्रदान केले जाईल.आपणा सर्वांचे शुभाशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत, म्हणून हे सारं शक्य झालं. याबद्दलकवी विजय जोशी ( विजो) यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.▪️
