
नांदगाव ( प्रतिनिधी )माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती पित्यार्थ मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दरवर्षी श्री.विजय आप्पा करंजकर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पुरस्कार वाटप केले जाते. विज्ञान व तंत्रज्ञान आदर्श गुणवंत शिक्षक म्हणून माध्यमिक विद्यालय पांझणदेव चे उपशिक्षक , नांदगाव तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष , इन्स्पायर अवॉर्ड मानक नांदगाव समन्वयक , नाशिक जिल्हा समन्वय समितीचे कार्यकारणी सदस्य तसेच नांदगाव तालुका टिडीएफचे प्रसिद्धीप्रमुख श्री . संजय प्रभाकर बच्छाव यांना आज शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री भास्कर भगरे, शिक्षक आमदार श्री. किशोर भाऊ दराडे तसेच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय आप्पा करंजकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. संजय बच्छाव यांनी 19 पदव्या, नेट -सेट सह 6 विषयात पात्रता परीक्षा, मराठी विषयात पी.एचडी चे संशोधन कार्य सुरू आहे .तसेच हिवाळी व उन्हाळी सत्रात 44 वेळेस विद्यापीठ परीक्षा उत्तीर्ण केली आहे. संजय बच्छाव यांना एन.डी.एस.टी सोसायटीचा उच्च शिक्षण पुरस्कार, म.स.गा महाविद्यालयात सुवर्ण पदकाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सार्वजनिक उत्सव समिती पांझणदेवचा उच्च विद्या विभूषित पुरस्काराने आता बाळासाहेब ठाकरे विज्ञान व तंत्रज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी एनडीएसटी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अरुण पवार शिक्षक नेते शिवाजी निरगुडे, नानासाहेब देवरे, के. के. अहिरे, साहेबराव कुटे, एन. डी.एस. टी. चे चेअरमन शांताराम देवरे, नेता बापू पवार संचालक संग्राम करंजकर,संजय मगर, छत्रे हायस्कूलचे संचालक प्रसाद पंचवाघ, अमोल अहिरे , गुणेश गुजर, महेंद्र पवार, उपस्थित होते. संस्थेचे सरचिटणीस अशोक डघळे, अध्यक्ष उत्तम गायकवाड, मुख्याध्यापिका वर्षा पाटील, मोहन कदम ,अनिल गोरे, सचिन अहिरे, रवींद्र गायकवाड ,बापूसाहेब पगारे , ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले
