
उल्का नगरी ( प्रतिनिधी ) दिनांक 27 एप्रिलला स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी निमित्ताने उल्का नगरी येथे किर्तन कार्यक्रम झाला. तेथील महाप्रसाद भोजनाच्या वेळी अन्न वाचवा समिती तर्फे अन्न नासाडी बद्दल जागृती अभियान करण्यात आले. कार्यक्रमास आलेल्या सर्व भक्तांनी अन्न वाचवा समिती च्या अभियाना स योग्य प्रतिसाद देऊन जवळपास 90 टक्के लोक स्वच्छ ताट जेवले . तसेच अन्न नासाडी प्रतिबंधक कायदा लागू व्हावा म्हणून किर्तनकार महाराज सह 400 लोकांनी निवेदनावर सह्या केल्या. यावेळी पण समितीचे आनंद मोटाळे चंद्रकांत वाजपेयी दिलीप आसबे नंदकुमार कुलकर्णी नागेश गवळी आनंद लोणकर यांनी अभियान राबवले

