
सिन्नर ( प्रतिनिधी )शनिवार दिनांक २६/०४/२०२५ शहरातील कानडी मळा परिसरातील आदर्श कॉलनी जुना गुळवंच रोड येथील माजी नगरसेवक श्रीकांत जाधव यांच्या सौजन्याने मुद्रांक विक्रेते जगन्नाथ इनामदार जनसेवक कराळे महामित्र दत्ता वायचाळे यांच्या सहकार्यातून व्हेन सामवेन गॅलत्सो बरखा मदान यांचे बुद्ध पूजा पाठ व प्रवचन यांचे आयोजन करण्यात आले होते बुद्ध पूजा पाठ म्हणजेच बुद्ध धर्मातील पूजा आणि धार्मिक विचारांचे मार्गदर्शन यात बुद्धवंदना त्रिसरण पंचशील आणि इतर धार्मिक मंत्रांचा समावेश असतो हे प्रवचन आपल्याला बुद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाशी परिचित करते

आणि चांगले जीवन जगण्यास मदत करते यात भगवान बुद्ध धम्माला आदराने वंदन करणे बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाण्याचा संकल्प करणे पाच नैतिक नियम अहिंसा सत्य चोरी न करणे व्यसन टाळणे आणि व्यभिचार न करणे हे नैतिक नियम स्वीकारणे व बुद्ध आणि धम्माला आदराने वंदन करणे बुद्ध धर्मातील इतर धार्मिक मंत्रांचे पठण बुद्ध धर्माचे मुख्य विचार नियम आणि मार्ग धम्म म्हणजे बुद्ध मार्गाचा मार्ग किंवा नियम स्वतःच्या आत असलेल्या ज्ञानाची जाणीव आत्मसमर्पणाची भावना चांगले जीवन जगण्यासाठी बुद्ध धर्माचे मार्गदर्शन धम्माचे ज्ञान आणि मार्गदर्शन देणारे सदगुरू हे समजून घेणे आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले त्याप्रसंगी मोठ्या संख्येने अनुयायी यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला

त्यानंतर स्नेहभोजनांनी या सोहळ्याची सांगता करण्यात आली व उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली या कार्यक्रमासाठी खालील मान्यवर उपस्थित होते शशिकांत शिंदे, एच.एन अहिरे, आनंद आढाव, प्रकाश शिरसाठ, वैशाली आढंगळे, (भीम आर्मी ता. अध्यक्ष), अशोक मोरे (मा. नगरसेवक), डी.एम शिरसाठ, शोभा जाधव, कल्पना पगारे, सागर आढाव, अनिता आढाव, संदीप भालेराव (बोद्धचार्य) यांनी सूत्रसंचालन केले.

