
सिन्नर प्रतिनिधी ( सोमनाथ गिरी):- तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने डुबेरे येशील सटूआई माता सभागृहामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे व तालुका संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे होते. व्यासपीठावर उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल वामने,सरपंच रामनाथ पावसे, माजी सरपंच शरद माळी, शालेय समितीचे सदस्य भाऊ रखमा वारुंगसे, काशिनाथ वाजे,अशोकराव गवळी, अरुण वारुंगसे , विजय वाजे, पोलीसपाटील रामदास वारुंगसे, विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले ,पर्यवेक्षक उल्हास पवार आदी उपस्थित होते . विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ‘ रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ‘ या उदात्त भावनेने मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी,सर्व संचालक मंडळ, तालुका संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर तालुका मोतीबिंदू मुक्त अभियान राबविण्यात आले आहेत . मुख्याध्यापक रंगनाथ उगले यांनी आपल्या प्रस्ताविकात शिबिराचा उद्देश स्पष्ट करून संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण शेठ वाजे म्हणाले की ,आपले डोळे अतिशय महत्त्वाचे असून डोळ्यांची योग्य प्रकारे निगा व काळजी घ्यावी. तसेच वर्षातून एकदा डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्यावी. तपासणी केल्यानंतर आपल्या मविप्र संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाची कुठलीही मदत आपणास लागली तर आमच्याशी किंवा विद्यालयाशी संपर्क साधावा . शिबिरामध्ये १५८ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकातील डॉ. सुमित चौधरी, डॉ. स्नेहा काळे, डॉ.लौकीक पेशट्टीवार यांनी तपासणी केली. त्यांना समन्वयक रवि सोनवणे, महेंद्र घोटेकर ,सदस्य सहकारी म्हणून मनिषा सोनवणे, निकिता कापडणीस, उत्तम साठे यांनी सहकार्य केले. आवश्यक रुग्णांना मोफत औषध उपचार देखील करण्यात आला. बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार आहे. गावातील व परिसरातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. सूत्रसंचालन पी.आर.करपे यांनी तर आभार वृषाली घुमरे यांनी मानले. शिबिर यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक रंगनाथ उगले,पर्यवेक्षक पवार,सोमनाथ पगार,सोमनाथ गिरी,डी.ए.रबडे,सुनिल ससाणे,रवि गोजरे,किशोर शिंदे, ज्ञानेश्वर कडभाने आदींसह सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .
